आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-नीलम माणगावे, इंदवी तुळपुळे यांना कोपर्डे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नीलम माणगावे, इंदवी तुळपुळे यांना कोपर्डे प्रतिष्ठानचा जीवनगौरव
पुरस्कार.

सातारा – येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्यावतीने सन २०२५चे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये जयसिंगपूर येथील ज्येष्ठ कवी,कादंबरीकार, नीलम माणगावे व मुरबाड – ठाणे येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या, अभ्यासक, लेखक इंदवी तुळपुळे यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य,कला, संस्कृती आणि
समाज परिवर्तन या क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणा-या दोन व्यक्तिंना एक वर्षाआड जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्काराचे हे पाचवे तर एकूण पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.
आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्षाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने यावर्षी देण्यात येणारे २०२५ चे जीवन गौरव पुरस्कार साहित्य क्षेत्राचा कृष्णामाई जीवनगौरव नीलम माणगावे यांना तर समाज परिवर्तन क्षेत्राचा सात- तारा जीवनगौरव पुरस्काराने इंदवी तुळपुळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जीवन गौरव पुरस्कारांचे हे पाचवे तर एकूण पुरस्कारांचे दहावे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरुप ४० हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह ,शाल पुष्पगुच्छ व सातारा कंदी पेढे असे आहे,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.
ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ, समीक्षक डॉ.गजानन अपिने व प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार निवडले आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डॉ.विजय चोरमारे मुंबई, डॉ.गजानन अपिने पुणे,कवी वसंत शिंदे सातारा,ॲड.श्रेयस कोळेकर कराड आणि ज्योत्स्ना पाटील- शिंदे मुंबई विश्वस्त असलेल्या या प्रतिष्ठानचा यावेळचा पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतीदिनी ३० जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये राजकीय, सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच यावेळी त्यांचे ” स्त्री-पुरुष समता आणि आजचे वास्तव ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यावेळी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या आर्ष पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या “बभ्रा” या कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात येणार आहे,अशी माहिती प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.
आतापर्यंत प्रतिष्ठानच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने महादेव मोरे( निपाणी), शांताराम पंदेरे (औरंगाबाद) ,मंगला बनसोडे (कराड), विश्वनाथ शिंदे( पुणे), प्रा. दिलीप जगताप (वाई ), अन्वर राजन (पुणे ),धनंजय गोवर्धने (नाशिक ),मकरंद साठे( पुणे ) आदी मान्यवर कलावंत लेखकांना गौरविण्यात आले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button