फलटण:-आदरणीय दिलीपसिंह भोसले (भैय्यासाहेब) एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
आदरणीय दिलीपसिंह भोसले (भैय्यासाहेब)
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
नेतृत्व,दातृत्व आणि कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे,शांत संयमी,असामान्य व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय भैय्यासाहेब. आज त्यांचा 73 वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आदरणीय भैय्यासाहेबांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक आरोग्यदायी शुभेच्छा!
भैय्यासाहेब आपण शतायुषी व्हावे, हीच
श्री सद्गुरु हरिबुवा महाराज चरणी प्रार्थना!
आपण कोणत्याही कार्यात सर्व प्रथम पुढाकार घेऊन सामाजिक, राजकीय शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात इतिहास घडवणारे एक व्यक्तिमत्व आहात.
कारण इतिहास हा कोणाचाही लिहिला जात नाही. त्यासाठी अपार कष्ट,मेहनत,जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास हा आपल्या नसानसात ठासून भरलेले आणि निस्वार्थीपणे सामाजिक, राजकीय,
शैक्षणिक,सांस्कृतिक, सहकार क्षेत्रासाठी कार्य करण्यास झोकून देणारे एक असामान्य व्यक्तिमत्व आहात.आणि असामान्य माणसंच डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतात, व पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत असतात. काही स्वप्ने ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात हे आदरणीय भैय्यासाहेब यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते.आणि अशी महत्वकांक्षा ठेवणारी माणसंच जगात असामान्य ठरतात.
प्रभू श्रीरामचंद्र व श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फलटण या ऐतिहासिक शहरामध्ये आदरणीय भैय्यासाहेब यांनी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाची स्थापना करून शैक्षणिक ,सामाजिक, साहित्यिक, सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत.
*असाध्य ते साध्य*
*करिता सायास*
*कारण अभ्यास*
ही संत तुकोबांची शिकवण आदरणीय भैय्यासाहेबांना हुबेहूब लागू पडते.एखादी गोष्ट मनावर घेतली की, माणूस यशाचे शिखर गाठू शकतो. हे भैय्यासाहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे आदरणीय भैय्यासाहेब यांच्या आतापर्यंतच्या सर्व उल्लेखनीय कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी ॲड.सौ.मधुबाला दिलीपसिंह भोसले (भाभीसाहेब )
यांनी मोलाची साथ दिली. आदरणीय सौ.भाभीसाहेब
आपल्या शिक्षण संस्थेतील सर्व मुलांची काळजी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे नेहमी घेत असतात.
आदरणीय भैय्यासाहेब हे हसतमुख व्यक्तिमत्व असल्याने ते नेहमी आनंदी असतात जिथे आनंदातून आनंद जन्माला येतो तिथे सुखाचे नंदनवन तयार होते. असेच नंदनवन भोसले कुटुंबियांमध्ये जाणवते.
आपल्या कुटुंबाचे “नंदनवन” एक वेगळ्या प्रकारे आदरणीय भैय्यासाहेब यांनी केल्याचे दिसून येते.
जसा अापण आपट्याच्या पानाने दसरा साजरा करतो, आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतो. तसेच आदरणीय भैय्यासाहेब रुपी पानाने समाजातील अनेक गरजू घटकांना वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मदत करून त्या सर्वांचे आयुष्य एक चांगल्या प्रकारे साजरे करून त्या सर्वांच्या आयुष्याला
सुंदर आकार देण्याचे काम त्यांनी केलेले दिसून येते.
ज्याप्रमाणे महारोग्यांच्या जखमांवर उपचार करून त्यांच्यातील चैतन्य जागवणारे बाबा आमटे आनंदवनाची निर्मिती करतात. मंग याच युगातील भैय्यासाहेब व भाभीसाहेब यांनी आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर उभारून गोरगरीब विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचे कार्य सुरु केले. व आज ही शिक्षणसंस्था एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. जिजामाता बालक मंदिर, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल इत्यादी माध्यमाद्वारे आपल्या संस्थेतील विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण घडवत असताना, तो संस्कारक्षम बनला पाहिजे. यासाठी त्यांनी शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले आहे.
आदरणीय भैय्यासाहेबांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरती असणारे हास्य जणू काही *smile is the best medicine in the world* *असा कानमंत्र देवून जाते. अशा या उत्तुंग, कार्यकुशल सम्राट अशा व्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा.
पुन्हा एकदा आदरणीय भैय्यासाहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले इथून पुढचे भावी आयुष्य हे सुखी समृद्धी, भरभराटीचे ,उत्तम आरोग्याचे जावो. आपण शतायुषी व्हावे.हिच श्री सद्गुरु हरिबुवा महाराज चरणी मनापासून प्रार्थना!
शब्दांकन – सौ.जयश्री तांबे