खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी बोगद्यामध्ये लाईटचा खांब तुटून अपघात.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी बोगद्यामध्ये आज सकाळी सहा वाजता वरचा लाईटचा असलेला अँगल अचानक तुटुन महामार्गावर चालत असलेल्या ट्रक वरती पडला. गाडी नं .KA/44/A/0525 ट्रक मधील चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . चालकाचे नाव व्यंकटेश रंगाप्पा वय 38 राहणार बेंगलोर कर्नाटक. त्या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवासाचे असे म्हणणे आहे की पोलिसांना फोन करून सुद्धा पोलीस सेवा मदतीसाठी आली नाही. त्यामुळे वाहनांची अफाट गर्दी झाली होती. वाहनांची गर्दी झाल्यामुळे परीक्षार्थी प्रवाशांना, विद्यार्थ्यांना कॉलेज साठी,शाळेसाठी कामगारांना कामासाठी जाण्यास उशीर होत आहे. त्यामुळे प्रवासाची तारांबळ झाली आहे.तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी गाडीतून उतरून आराम हॉटेल जवळ जाऊन ट्राफिक घाटातून खाली सोडले.
लवकरात लवकर प्रशासनाने प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयी बाबत प्रवाशांना व वाहनांना मुक्त करावे.कोणत्याही प्रवाशाला अडचण येणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी व त्वरित झालेला बिघाड व्यवस्थित करावा. यापूर्वीही या ठिकाणी असले प्रकार बऱ्याचदा घडलेलले आहेत. बोगद्याचे अँगल बरेच वर्षापासूनचे असल्यामुळे ते कुमकुवत झाले आहेत. अशा घटना घडल्या असुनही महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे स्पष्ट होत आहे. त्याची पडताळणी करून झालेला बिघाड व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे यापुढे असे अपघात मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. हे अपघात टाळण्यासाठी यावर ठोस पाऊल उचलले जावे. अशी प्रवाशांची आणि वाहन चालकांची मागणी आहे.