वाई:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेणवली येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आयपीएस माननीय श्री कमलेश मीना साहेब तसेच वाई पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर वाळुंज यांचे युवकांना मोलाचे मार्गदर्शन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वाई:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेणवली येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आयपीएस माननीय श्री कमलेश मीना साहेब तसेच वाई पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर वाळुंज यांचे युवकांना मोलाचे मार्गदर्शन.
आज दिनांक 16 /8 /2023 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मेणवली या ठिकाणी मेणवली विकास सेवा सोसायटी मेणवली,भोगाव पांडेवाडी, ग्रामपंचायत मेणवली, भोगाव ,पांडेवाडी ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय मेणवली या ठिकाणी वाई पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आयपीएस माननीय श्री कमलेश मीना साहेब तसेच वाई पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर वाळुंज यांनी युवकांना अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केले यामध्ये सध्याची वाढती गुन्हेगारी ,घरफोडी ,मोबाईलचा अविपरीत परिणाम ,सायबर क्राईम , गाडी लायसण हेल्मेट चा वापर,सार्वजनिक उत्सव कशा प्रकारे साजरे करावेत याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन तसेच ग्रामसुरक्षा दलाची कामे गावामध्ये सीसीटीव्हीचे महत्त्व अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या विषयावर सखोल असे मार्गदर्शन युवकांना तसेच ग्रामस्थांना यावेळी करण्यात आले ग्रामस्थांच्या व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने श्री मीना साहेब तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवाजी उदय मंडळ मेणवली मेणेश्वर तरुण मंडळ मेणवली मिलिंद तरुण मंडळ मेणवली उमाजी नाईक मित्र मंडळ मेणवली ,ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य , मेणवली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.