मिरज:-जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृती )
जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच कला उत्सव 2025 मोठ्या दिमाखात साजरा झाला .इ 1 ली ते 8वी पर्यंतच्या जवळ जवळ 320 मुलां मुलीचा सहभाग या गॅदरिंग मध्ये होता . या स्नेहसंमेलनमध्ये उत्कृष्ट पद्धतीचे नृत्यांचे अविष्कार मुलांनी सादर केले . मधुर व गोड वाणीच्या निवेदनाने तर त्यात आणखी रंजकता आली . नाटकातील मुलांचे अभिनय तर हास्याचा वर्षाव करून गेले . त्यात भर म्हणून माझ्या विजयनगर गावातील लोकांनी बक्षिसांचा जणू पाऊसच पाडला .लहान मुलांचे नृत्याचे सादरीकरण नादखुळाच होते . आई या विषयावरील नृत्यात तर शिक्षकासहित अनेक पालकांचे डोळे पाणावले होते . मोठ्या मुलांच्या डान्स मध्ये तर नाविण्यता व अचूकता होती .काही मुले तर पहिल्यांदाच डान्स करत होते त्यावेळेस पालकांच्या चेहर्यावरील समाधान एक प्रकारचा आनंद देवून जात होते . स्नेहसंमेलन पाहण्यासाठी जमलेली तुडुंब गर्दी तर कार्यक्रम पाहण्यासाठी सांगली जिल्हयातून आलेल्या शिक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
उत्कृष्ट नियोजन , त्याची योग्य पद्धतीने अमंलबजावणी , सुशांत सर व अजय सर ( सर्जा-राजा ) यांचा योग्य डान्स सराव , मुख्याध्यापक व शिक्षकांचे कष्ट- अचूक मार्गदर्शन, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत विजयनगरची अनमोल साथ ,माझ्या विजयनगर गावातील लोकांची उत्तम मदत, उत्कृष्ट स्टेज व साऊंड व्यवस्था यामुळेच दर्जेदार व अलौकिक कार्यक्रम सादर करता आले.
शेवटी एवढचं म्हणेण एकत्रित येणे ही सुरुवात असते.एकत्रित रहाणे ही प्रगती असते,एकत्रित काम करणे हे यशाचे लक्षण असते.
पुन्हा एकदा सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकाचे ,सर्व देणगीदारांचे , सर्व ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद म्हणून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.