मायणी:-मायणी सिध्दनाथ यात्रेत राजकीय जुगलबंदी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी सिध्दनाथ यात्रेत राजकीय जुगलबंदी.
– मायणी प्रतिनिधी : ( फोटो- सुरेंद्र गुदगे) (फोटो – डॉ.दिलीपराव येळगावकर ) मायणी येथील सिध्दनाथ रथोत्सव या दिवशी सायंकाळी यात्रा कमिटीने करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्यावर यशोदिप पतसंस्थेवरुन तोफ डागली.तसेच ग्रामपंचायतीत त्यांची सत्ता असताना आम्हाला बाजार पटांगण कार्यक्रमासाठी दिले नाही तसेच त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे असे सांगितले.त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर गुरुवारी १४ डिसेंबर रोजी डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यामुळे केलेल्या आरोपांना डॉ.येळगावकर काय उत्तर देणार याबद्दल उत्सुकता वाढल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर माजी आमदार डॉ.येळगावकर यांचे आगमन झाले.त्यानंतर त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितले की मी मायणी सोडून पळून जाणारा कार्यकर्ता नाही.मी मरेपर्यंत मायणी सोडणार नाही.केवळ तुमच्या बंधुमुळे आमची सत्ता गेली हे खरे असून ज्यांनी तुम्हाला मते दिली ते मतदार आता आम्हाला भेटून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागत आहेत.तसेच कर्जदारांना यशो दीप पतसंस्थेत पैसे भरू नका,मी तुम्हाला वकील देतो असे तुम्ही सांगता.नेहमी आपली आडवी चाल आहे असे सुरेंद्र गुदगे यांना उद्देशून सांगितले.डॉ.येळगावकर पुढे म्हणाले,आम्ही मातोश्री सरुताई माऊलींचे सुसज्ज मंदिर उभा केले.टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावात सोडल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे तसेच मेडिकल कॉलेजचा मी स्वतः राजीनामा दिला आहे.येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत माझ्या घरातलाच उमेदवार भाजपकडून उभा करणार आहे,सावध रहा! असे सांगितले.