औरंगाबाद:-दर वर्षीप्रमाणे श्री गजानन सर्व्हिसेस तर्फे जिल्ह्यातील वीर माता-पिता, वीरपत्नी तसेच सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दर वर्षीप्रमाणे श्री गजानन सर्व्हिसेस तर्फे जिल्ह्यातील वीर माता-पिता, वीरपत्नी तसेच सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
थंडी, ऊन, वारा व पाऊस कशाचीही पर्वा न करता डोळ्यात तेल घालून जवान सीमेवर कार्यरत असतात. सैनिकांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाज गौरव पुरस्कार प्राप्त तथा पूर्व भारतीय सैनिक श्री गजानन पिंपळे यांनी वीर माता पिता व वीरपत्नी यांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेतली व दिवाळी निमित्त मिठाई भेट दिली. तसेच परिसराच्या स्वच्छतेची सातत्याने काळजी घेणारे सफाई कामगाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हडको येथील सफाई कामगार यांच्या टीमला मिठाई वाटप करून दिवाळी कामगारांची दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न गजानन सर्व्हिसेसचे संचालक गजानन पिंपळे यांनी केला. तसेच कंपनी साठी सतत झटत राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा बोनस वाटप केला. यावेळी गजानन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल तिळवे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.