क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-चौकीदाराच्या पक्षातील महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताच्या वेळी चोरांचा धुमाकूळ.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

चौकीदाराच्या पक्षातील महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताच्या वेळी चोरांचा धुमाकूळ.

फलटण दि: प्रधानमंत्री नही ,,तो चौकीदार हु ! अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिव शक्ती परिक्रमा यात्रेमध्ये स्वागत करतानाच चोरट्यांनी धुमाकूळ घातला . स्थानिक पत्रकारांना ही फटका बसला.सदरची घटना फलटण शहरात घडली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण नगरीमध्ये रामराज्य असे समजले जाते. त्याला मात्र गालबोट लागल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे .
याबाबत माहिती अशी की, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी १२ जिल्ह्यातून शिव शक्ती परिक्रमा यात्रा सुरू केलेले आहे .सातारा जिल्ह्यातील फलटण शहरांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील चौकात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फलकबाजी फटाक्याची बाजी व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोठा चौख पोलीस बंदोबस्त असतानाही आदरणीय भाजप महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाहनाचा ताफा थांबताच भाजप कार्यकर्त्यांनी तसेच काही चोरट्यांनी गाडीभोवती गर्दी केली. या गर्दीमध्ये धक्काबुक्की व फोटो काढण्यासाठी झालेली धडपड पाहून चोरट्यांनी आपला हेतू साध्य केला.
गर्दीचा फायदा घेऊन भाजप डॉक्टर सेलचे फलटण शहर अध्यक्ष डॉक्टर सुभाष गुळवे सांगवी येथील महादेव कदम व ज्येष्ठ पत्रकार पोपट मिंड अशा तिघांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने हातोहात लांबवली. सदर गर्दीतून बाहेर पडल्यानंतर या दोन भाजपच्या समर्थकांना व पत्रकाराला आपल्या गळ्यातील सोनसाखळी हातोहात लांबवल्याचे लक्षात आले .त्यामुळे चौकीदारांच्या पक्षातील नेते चे स्वागत करताना या घटनेची खमंग चर्चा सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता आदरणीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या सुरक्षा पथकाचा ताफा सज्ज असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीचा सुगावा लागल्यामुळे चोरट्यांना आपला हात साफ करता आलेला आहे .आता पोलीस तपास यंत्रणेने क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील सीसीटीव्ही फुटेज फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग व इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे .
याबाबत फलटण शहरचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे अधिक तपास करत आहेत. शिवशक्ती परिक्रमा धार्मिक कार्यक्रमातही चोरट्यांनी प्रवेश केल्यामुळे आता देवदर्शनाला जाताना दागिने घालावे की नाही ? याची पण आता चर्चा सुरू झालेली आहे.
फलटण शहरातील वाढत्या गुन्हेगारी व वाढत्या अवैद्य व्यवसाय निमित्त अनेक जण फलटणमध्ये वास्तव्यास असतील हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे .विशेष म्हणजे फलटण शहर हे नावलौकिक शहर आहे. अनेक राजकीय वर्ष वर्चस्व व त्यांच्या समर्थक यांचे वर्चस्व असूनही हात की सफाई केल्यामुळे एक ही भूल,,,, कमल का फुल अशी आता विरोधक टीका करू लागलेले आहेत.
——————————————————
चौकट -शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे बातमी करण्यासाठी पत्रकार प मिंड यांनी गर्दीत जाऊन वस्तुनिष्ठ बातमी देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने हातोहात लांबवली आता ती बातमी कितीला पडली ? असा प्रश्न विचारणा होत आहे.

———————&————+-+———–
फोटो -फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताच्या वेळी झालेली गर्दी (छाया अजित जगताप- सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button