कृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-मौजे सोनवडी बु.गावच्या हद्दीत ४४ वासरांना कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी आशितोष चव्हाण

फलटण प्रतिनिधी:- मौजे सोनवडी बु. गावच्या हद्दीत कत्तल करण्याचे इराद्याने ४४ वासरे डांबून ठेवून कत्तल करण्यास घेऊन जात असताना ग्रामीण पोलिसांनी एकूण 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त केला असून आठ जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 5 रोजी 12.35 वाजण्याच्या सुमाराला मौजे सोनवडी बु. तालुका फलटण गावच्या हद्दीत सोनवडी बुद्रुक ते भाडळी खुर्द जाणारी रोड लगत तीन पत्राच्या शेडमध्ये इलाही हुसेन कुरेशी, शाहिद रशीद कुरेशी, शाहरुख जलील कुरेशी, दिशान इमान कुरेशी, तोफिक इम्ताज कुरेशी, इनायक हुसेन कुरेशी, आफताब अफसर कुरेशी (सर्व रा. कुरेशी नगर, फलटण), रामा भानुदास जाधव (रा. पुजारी कॉलनी, फलटण) यांनी मिळून एकूण 44 जर्सी गायीचे लहान वासरे विना चारा पाणी सोय न करता कत्तल करण्याचे इराद्याने डांबून ठेवले त्यांची कोणत्याही प्रकारची सोय न करता कमी जागेमध्ये निर्दयपणे दाटीवाटीने भरून कत्तल करण्यास घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आली. या कारवाईत 20 हजार रुपये किंमतीची 10 जर्सी गाईची लहान वासरे वय अंदाजे 1 महिना काळे पांढरे रंगाचे, 52 हजार रुपये किंमतीची 26 जर्सी गाईची लहान वासरे वय अंदाजे 1 महिना काळे पांढरे रंगाचे, 16 हजार 8 जर्सी गाईची लहान वासरे वय अंदाजे 1 महिना काळे पांढरे रंगाचे असा एकूण 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याबाबत पो. कॉ अमोल शिवाजी घोरपडे यांनी फिर्याद दाखल केली असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार खाडे करत आहेत.

कत्तल करण्याचे इराद्याने डांबून ठेवण्यात आलेली वासरे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button