सातारा:-नव्याने अधिस्विकृती पत्रिका मंजूर झालेल्या पत्रकारांना आधीस्वीकृती पत्रिकेचे वितरण.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
नव्याने अधिस्विकृती पत्रिका मंजूर झालेल्या पत्रकारांना आधीस्वीकृती पत्रिकेचे वितरण.
सातारा जिह्यातील पत्रकारांनी अधिस्वकृती पत्रिकेसाठी अर्ज करावेत- हरिष पाटणे.
सातारा, दि. 10: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राप्त अधिस्वीकृती पत्रिकांचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास समितीचे सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, पुणे विभागाच्या प्रभारी माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे उपस्थित होते.
जुलै 2024 मध्ये झालेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने 5 पत्रकारांचे अधिस्वीकृतीचे अर्ज व सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत 2 अधिस्वीकृती अर्ज विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केले होते. विभागीय समितीने मंजूर करून पाठवलेल्या या अर्जांना राज्य समितीमध्ये मंजुरी मिळाली होती. मंजूर झालेल्या अधिस्वीकृती पत्रिका अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते पत्रकारांना वितरीत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी कागदपत्रांची पुर्तता करुन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे अर्ज करावेत, असे आवाहनही समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले आहे.