पारनेर:-स्वप्निल गंगाराम मोढवे या शालेय विद्यार्थ्यांने रेखाटले लोकनियुक्त सरपंच राठोड यांचे रेखाचित्र.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
स्वप्निल गंगाराम मोढवे या शालेय विद्यार्थ्यांने रेखाटले लोकनियुक्त सरपंच राठोड यांचे रेखाचित्र.
RPS स्टार न्यूज प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे गाव तसं पाहायला गेलं तर दुर्गम भागातील हे गाव परंतु विठ्ठल राही रुक्मिणी सह विठ्ठल देवस्थान या पळशी गावा मध्ये आहे, म्हणून ह्या गावाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, आजही गावाच्या भोवती खूप मोठी तंटबंदी दिमाखाने उभी आहे.
काही दिवसापूर्वी या गावचा कारभार पाहण्याची सुरुवात प्रकाश शेठ राठोड यांनी पळशी नगरीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून केली. त्यांच्या कार्याची सुरुवात गावचे सरपंच म्हणून जरी झाले असले तरी त्यांचं सामाजिक काम चांगल आहे आणि हे काम गावकऱ्यांना भावलं आणि त्यामध्ये तरुण कसे मागे राहतील. परंतु या तरुणा समवेत शालेय विद्यार्थी आबाल वृद्ध या प्रकाश शेठच्या समाजकार्याने हुरळून गेले.
अशाच एका स्वप्निल गंगाराम मोढवे नावाच्या शालेय विद्यार्थाने प्रकाश शेठ राठोड यांच्या कार्यास प्रेरित होऊन त्यांचे हुबेहूब रेखाचित्र तयार करून त्यांना सप्रेम भेट दिले आणि ही भेट पाहून सरपंच प्रकाश शेठ राठोड भारावून गेले. आज निपक्षपातीपणे गावामध्ये प्रकाश शेठ राठोड काम करत आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. आज खऱ्या अर्थाने *स्वप्निल गंगाराम मोढवे* या शाळकरी मुलांने दाखवून दिलं. त्यामुळेच दिवसेंदिवस सरपंच प्रकाश शेठ राठोड यांची क्रेझ तरुणांमध्ये वाढत चालली आहे.