युवा नेते उद्धव दादा कर्णे यांचा आज वाढदिवस समाजशील नेतृत्व.
प्रतिनिधी :-अभिजीत लेंबे :-9822883516

*युवा नेते उद्धव दादा कर्णे यांचा आज वाढदिवस. समाजशील नेतृत्व*
पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी /अभिजीत लेंभे
उद्धव दादा कर्णे बुधवार, दिनांक, 13 जुलै ,रोजी वाढदिवस त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. करंजखोप ता. कोरेगाव सारखे छोटयाश्या गावामध्ये सामान्य कुटुंबात जन्म घेऊन बालपणापासून संघर्ष अनुभवत संघर्षातून धडपडत आपल्या कर्तुत्वाला झळाळी देणारे हे व्यक्तिमत्व आपल्या गोड वाणीने प्रेमळ स्वभावाने माणसे जोडत माणुसकीने सुंदर जाळे विणलं उद्धव कर्णे, यांनी सामाजिक कार्यातून समाजसेवा साधली असून, उद्धव दादा यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. घरातील चांगल्या कामाचे संस्कार न कळतच होते गेले. त्यांनी आपल्या कार्यातून मोठा मित्रपरिवार जोडला आपले मित्रांच्या अडीअडचणी स्वतःला झोकून देण्याच्या स्वभावामुळे सच्चा मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. गरिबांच्या मदतीला नेहमी अग्रेसर राहतात. मोकळ्या मनाचा जीवला जीव देणारा तरीही समाजाच्या दृष्टीने दबंग ठरलेल्या आमच्या सच्चा मित्राला, उज्वल भविष्यकाळात, उत्तम आरोग्य हीच लाभो,हिच वाढदिनी ईश्वरचरणी प्रार्थना बुधवार, दिनांक. 13 जुलै, रोजी ते करंजखोप येथे सायंकाळी 6 ते 8 आठ यावेळेत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.*