ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी चिंचवड:-महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ८ कोटी ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२२:- महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ८ कोटी ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक  शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

         दरम्यान, मांजरांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करणेकामी धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणास आणि महापालिकेच्या भोसरी येथील पै.मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र नरसिंग रेसलिंग अॅकडमीला १० वर्षे कराराने चालविण्यास देण्यात येणार आहे. या विषयास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

सन २०२२-२३ करिता जुनी सांगवी आणि नवी सांगवी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी ५७ लाख रुपये खर्च होईल. सन २०२२-२३ करीता पिंपळे निलख गावठाण, रहाटणी स. क्र.२० टाकी, ताथवडे, पुनावळे, काळाखडक टाकी, लक्ष्मणनगर व गणेशनगर टाकी, वाकड, भगवाननगर टाकी व  त्यावरील बायपास जलक्षेत्र तसेच दत्तनगर जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचलन करण्यासाठी  मजूर पुरविण्यात येणार आहेत. याकामी ३ कोटी ४ लाख रुपये खर्च होणार आहेत. सन २०२२-२३ करीता प्रभाग क्र.२० व ३० मधील संत तुकारामनगर व कासारवाडी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२-२३ करिता दापोडी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी ६० लाख रुपये खर्च होणार आहेत.  थेरगावातील पवारनगर नं.२ ते प्रसुनधाम सोसायटी या रस्त्यामध्ये येणारा अति उच्चदाब (इएचव्ही) टॉवर हलविण्यात येणार आहे. याकामी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२-२३ करिता प्रभाग क्र. १७ मधील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीं ची स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकामी २३ लाख रुपये खर्च होतील. प्रभाग क्र.७ भोसरी येथील जलतरण तलावाची खोली कमी करण्यात येणार असून तेथे स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. याकामी २ कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button