पारनेर:-रांजणगाव जिल्हा परीषद शाळेत प्रथमच युकेजीचा वर्ग चालु!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रांजणगाव जिल्हा परीषद शाळेत प्रथमच युकेजीचा वर्ग चालु!

पारनेर (राजकुमार इकडे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी नव्याने यूकेजी वर्ग सुरू करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पट वाढवा व विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतच युकेजी वर्ग नव्याने सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारदिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाडण्यात तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री ढवळे साहेब तसेच रांजणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिंदे साहेब तसेच रांजणगाव गावचे सरपंच महेश काका देशमुख उपसरपंच दादा शिंदे हे उपस्थित होते.
या वर्गाचे नियोजन करण्यात आले विशेष करून गावातील सामाजिक कार्यकर्ते सौ प्रियंका ताई शिंदे सौ राणीताई यादव प्राजक्ता चहाल व शिंदे सर यांनी विशेष प्रयत्न केले.
या उद्घाटन प्रसंगी पालकांनी तसेच ग्रामस्थांनी विशेष करून या वर्गाचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. हा युकेजी वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री खंडेराव साबळे उपाध्यापक श्री पठारे संदीप व तसेच उपाध्यापिका श्रीमती गांधाडे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. हा यूकेजी वर्ग सुरू करून पालकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा सर्व शिक्षकांचे सर्व भागातून कौतुक केले जात आहे.




