ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कन्नड :- ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांना आजी-माजी सैनिकांन तर्फे सत्कार.

प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांना आजी-माजी सैनिकांन तर्फे सत्कार.

दि. 02/02/2023
नुकतेच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्येच कन्नड पंचक्रोशीत सैनिकांचे गाव अशी ख्याती असलेल्या नाचनवेल- कोपरवेल गावाची सुद्धा निवडणुका झाल्या. या मध्ये निवडून आलेल्या सरपंच सौ. कासाबाई शिवाजी थोरात , उपसरपंच श्री. रावसाहेब शिंदे, श्री. किरण थोरात, श्री. नरेश वैद्य, श्री. संजय पिंपळे, सौ. ज्योती राजेंद्र राजपूत, सौ.लीलाबाई प्रल्हाद राजपूत, सौ. शबाना बी शहा, सैनिक पत्नी श्रीमती. जिजाबाई शिंदे, सौ.रेखाबाई धुमाळ, सौ.भाग्यश्री रामू राजपूत, श्री. अक्षय चौथमल आदी सदस्यांचे आजी-माजी सैनिक मित्र मंडळ नाचनवेल-कोपरवेल तर्फे *सैनिक भवन* येथे सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सर्वप्रथम सैन्यदलातील अधिकारी स्वर्गीय कॅप्टन. प्रकाश थोरात यांना स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी पूर्व भारतीय सैनिक श्री भिवसन थोरात, समाज गौरव पुरस्कार प्राप्त श्री. गजानन पिंपळे, श्री मंजीत थोरात, श्री दिपक थोरात, श्री. देवराव शिंदे, श्री. गणेश आग्रे आदी माजी सैनिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गजानन पिंपळे यांनी सैनिकांना योग्य मान सन्मान द्यावा कारण सैनिक हे आपल्या तारुण्यातील संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या संरक्षणासाठी व्यतित करतो त्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल कोणी सुद्धा घेत नाही. त्यांच्या या समर्पण प्रती तसेच ग्रामस्थांसाठी विशेष विचार करावे व राजकारणाचा विचार न करता गावाच्या सर्वांगीण विकासा साठी आपले योगदान कसे लाभेल याचा विचार करावा असे मनोगत व्यक्त केले. श्री. शिवाजी थोरात, श्री. प्रल्हाद राजपूत, गौरव पिंपळे, अक्षय शिंदे व इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती व पत्रकार श्री रवींद्र पिंपळे (सामना) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button