खटाव:-पुसेसावळी शहरात घुमला जय श्री राम चा नारा मंगल अक्षता कलशाची भव्य मिरवणूक.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राइम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राइम रिपोर्टर
पुसेसावळी शहरात घुमला जय श्री राम चा नारा मंगल अक्षता कलशाची भव्य मिरवणूक.
पुसेसावळी दि.30 अयोध्येतुन आलेल्या अभिमंत्रित मंगल अक्षता कळशाची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्य, तुतारीच्या निनादात फटक्याच्या आतशबाजीसह प्रभू श्री रामाच्या जयघोशात अभिमंत्रित कलशाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी अवघी पुसेसावळी रामायण होऊन आयोध्यानगरीच अवतरली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते प्रारंभी श्री राम मंदिर येथे मठाधीपती प. पूज्य. सुंदरगिरी महाराज, वडगाव जयराम स्वामी मठाधीपती विठ्ठल स्वामी महाराज, वेताळ भक्त दादा महाराज, ह.भ.प बंडा तात्या कराडकर , अशोक महाराज,, विक्रमशील कदम,यासह भजनी मंडळ, ग्रामस्थ्यांच्या उपस्थितीत मंगल अक्षता कलशाची पूजा करण्यात आली महाआरतीने रथयात्रा मिरवणूकिस प्रारंभ करण्यात आला ग्रामस्थानी रथयात्रा परिक्रमा मार्गामध्ये स्वागत कमानी उभारून रस्त्याच्या दुतर्फी रांगोळी काढून फुलांचा वर्षाव केला शोभायात्रा मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता महिलांनी भगवा फेटा तर युवकांनी भगवी टोपी परिधान केली होती यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, श्रीकांत पिसाळ आदी मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला मिरवणूक परिक्रमा श्री राम मंदिर येथून सुरु होऊन आझाद चौक, हनुमान मंदिर, त्रिमूर्ती चौक, बुधवार पेठ, दत्तचौक, तुळजाभवानी मंदिर, दक्षिण मुखी मारुती मंदिर मुख्य रस्त्याने पुन्हा श्रीराम मंदिर येथे येऊन महाआरतीने शोभा यात्रेची सांगता करण्यात आली सकल मराठा सनातन हिंदू समाज पुसेसावळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या माध्यमातून या शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले या शोभायात्रेचे वाहतुकीचे नियोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, हवालदार राहुल सरतापे, किरण हिरवे, राहुल वाघ, पंकज भुजबळ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले