कोरेगाव :-श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा…… वीस वर्षांनी आश्रमशाळा परिवारातील घटकांची पुन्हा एकत्र भेट.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा…… वीस वर्षांनी आश्रमशाळा परिवारातील घटकांची पुन्हा एकत्र भेट.
ब्रह्मपुरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेऊन गेलेले माजी विद्यार्थी आश्रमशाळेच्या आठवणीने पुन्हा एकत्र आली व बालपणीच्या आठवणीमध्ये रममान झाली.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री मधुसूदन मोहिते पाटील (दादा) व आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या शुभहस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आश्रमशाळेतील कलामंचातील विद्यार्थिनींनी गायलेल्या संदेश गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळा परिवाराचे कुटुंबप्रमुख मधुसूदन मोहिते- पाटील (दादा), आजी, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.
माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देताना आपल्या आश्रमशाळेतील अनेक आठवणींना उजाळा दिला. अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
यावेळी आजी,माजी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा. श्री मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थांनी आयोजित केलेल्या स्नेहबंध मेळाव्याच्या हेतूचे कौतुक केले. या आश्रमशाळेच्या संस्कारात राहून शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्वावलंबी होऊन सामाजिक बांधिलकीने कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करत आहेत त्याचा अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने व सामाजिक बांधिलकी स्वीकारून आपला दिवंगत मित्र सिद्धेश्वर तागडे याच्या कुटुंबाला रक्कम रुपये २०००० ची आर्थिक मदत दिली. आश्रमशाळेतील लहान मुलांना कपडे धुण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वॉशिंग मशीनसाठी रक्कम रुपये २५,००० चा धनादेश संस्थेस सुपूर्द केला. माजी विद्यार्थी गोरख धोत्रे याने यानिमित्ताने सर्वांना मिष्टान्न भोजन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल देवकांत, सूत्रसंचालन उमाजी पाटोळे व आभार महेशकुमार बोभाटे यांनी मानले.