बावधन :-प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत आज बावधन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गर्भवती महिलांची नियमितआरोग्य तपासणी शिबीर.
प्रतिनिधी पंकज पिसाळ सातारा :-7709034150

सातारा :-वाई :-दि :-10/08/2022.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत आज बावधन प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन, ता वाई येथे गर्भवती महिलांची नियमितआरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी हिमोग्लोबिन, थायरॉईड, ब्लड शुगर, OGTT इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. GDM, Thyroid असणाऱ्या स्त्रियांना त्याप्रमाणे औषधे देण्यात आली.
तसेच, यावेळी निमा, शाखा वाई, निमा वूमन्स फोरम , वाई , रोटरी क्लब, वाई तर्फे मा. रोटरी अध्यक्ष., निमा वूमन्स फोरम अध्यक्ष डॉ. जयश्री जगताप , मा. रोटरी अध्यक्ष, निमा वूमन्स फोरम उपाध्यक्ष डॉ. नीलम भोसले यांनी “स्तनपान, आहार विहार” या विषयावर गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करून त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन चे वैद्यकीय अधिकारी, निमा शाखा वाई चे सदस्य डॉ.पंकज पिसाळ, आरोग्य सहाय्यक श्री राऊत, फार्मसिस्ट श्री फरांदे, लॅब टेक्निशियन सौ. भोसले, श्री कारळे,परिचारिका श्रीमती.ठोंबरे, श्रीमती. भिसे, श्रीमती. प्राजक्ता चव्हाण,श्रीमती. आश्विनी कांबळे, श्रीमती. मडावी,.श्रीमती. चौरे, श्री पिटे, वाहनचालक श्री पालवे व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन श्री पिटे यांनी केले.