आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-मौजे नडशी येथे वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

मौजे नडशी येथे वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

कराड:16 राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव व्हावा म्हणून एन एस एस हा उपक्रम चालवला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रम करण्याचे संस्कार होत असतात. त्यांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते. या शिबिराच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचे काम स्वयंसेवकांच्या मार्फत होत असते असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे माननीय श्री विजय बबनराव विभूते साहेब प्रभारी गटविकास अधिकारी ,कराड हे वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या ज्युनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ” विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.
भारतात असा कोणीही नसेल ज्याला श्यामची आई हे पुस्तक माहिती नसेल. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातील श्यामच्या आईने श्यामला श्रमसंस्काराचे धडे कसे दिले हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे 1969 मध्ये सुरू झाली. असे विचार माननीय श्री भार्गव महादेव पाटील प्राथमिक शिक्षक ,नडशी यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भाषणात व्यक्त केले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. श्री .अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला साहेब (जनरल सेक्रेटरी ,श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड ) व मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य,श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) तसेच मा. श्री. गोविंदराव कृष्णा थोरात (लोकनियुक्त सरपंच ,नडशी) व मा.डॉ. एस .बी. केंगार सर (प्राचार्य यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड) हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व एन .एस. एस गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत वेणूताई चव्हाण कॉलेज चे मा. प्राचार्य डॉ. एल.जी .जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री .आर.ए .कांबळे सर यांनी केले .शिबिराचा उद्देश एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी एस. पी. पवार यांनी सांगितला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. श्री .एन .बी. पाटील यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.श्रीमती. आर. एस .पाटील यांनी केले.यावेळी वेणूताई चव्हाण कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंसेवक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button