आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कणकवली:-प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली:-प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू.

कणकवली:-प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वागदे गावातील ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांचे प्लेटलेट्स एवढे कमी झालेले असतानाही त्यांना एडमिट का करून घेतले नाही, असा सवाल ग्रामस्थांनी करत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना धारेवर धरले. राजेंद्र यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. घडल्या प्रकारामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण काहीसे तंग झाले आहे.




