पुणे चिंचवड:-थरमॅक्स चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालक मृत्यूमुखी तर प्रवाशी जखमी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
थरमॅक्स चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत
रिक्षाचालक मृत्यूमुखी तर प्रवाशी जखमी.
चिंचवड, दि. 28 (शफिक शेख):- थरमॅक्स चौक येथे अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक प्रेम महादेव जगताप या 27 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर रिक्षातील प्रवासी जखमी झाला. या घटनेनंतर अज्ञात वाहनचालक हा पळून गेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 26/11/2022 रोजी पहाटे 3.00 वाजेच्या सुमारास आकुर्डीहून कस्तुरी मार्केट ला जाणा-या रिक्षा क्रमांक एम एच 14 जी सी 4843 या रिक्षाला भोसरीहून तळवडेकडे जाणा-या अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला. या धडकेत रिक्षाचालक हा अत्यंत धोकादायक पद्धतीने जखमी झाला तर रिक्षातील प्रवासी किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा तेथे न थांबता वाहनासह पळून गेला.
या प्रकाराची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक नाथा केकन हे पोलीस हवालदार चव्हाण आणि शिपाई लोंढे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले आणि जखमी रिक्षाचालकास बर्ड व्हॅली येथील धनश्री हॉस्पिटल येथे दाखल केले. तसेच जखमी प्रवाशी बंडू म्हात्रे यांनाही तेथेच उपचार दिले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रिक्षाचालक प्रेम जगताप यास मृत घोषित केले. मयत रिक्षाचालक प्रेम जगताप हे आनंद नगर चिंचवड येथे रहावयास आहेत.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक केकन यांनी फिर्यादी असलेल्या प्रवाशी म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून भा. दं. वि. कलम 279, 338, 304 (अ), 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177, 132 (1)क प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासास सुरूवात केली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी त्यांनी थरमॅक्स चौकातील वाहतूक शाखेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी गेले असता ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे श्री. केकन यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.
या संपूर्ण प्रकारात अनेक ठिकाणी शासनाचा हलगर्जीपणा दिसून आला वाहतूक शाखेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे हे पोलिसांना तपासात अडथळा निर्माण करण्याचे कारण झाले. तरी पोलीस उपनिरीक्षक श्री. केकन यांनी पहाटे 3.00 वाजले असतानाही कार्यतत्परता दाखविली आणि पो. हवालदार चव्हाण आणि शिपाई लोंढे यांनी त्यांना सहकार्य केले. यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.