आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-अन्नदानातून युवा कार्यकर्ते पंकज खुडे यांनी साजरा केला वाढदिवस.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

अन्नदानातून युवा कार्यकर्ते पंकज खुडे यांनी साजरा केला वाढदिवस.
सातारा दि: वाढदिवसानिमित्त सध्या रात्री फटाक्याची आतिषबाजी करणे. रस्त्यावर तलवारीने केक कापून धिंगाणा घालण्यासाठी दिवस आहे.अशी ओळख काही तरुणाईची झाली आहे. या सर्व गोष्टीला फाटा देऊन सातारा शहरातील युवक पंकज खुडे यांनी अन्नदान करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या विधायक उपक्रमाबद्दल मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याबाबत माहिती अशी की, प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवस हा आनंदाचा क्षण असतो. या क्षणा निमित्त आपले गुरु व पालकांना तसेच मित्र परिवारांना वंदन करून एकमेकांना चांगल्या शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम असतो. परंतु ,या सर्व गोष्टीला फाटा देऊन अलीकडे तोंडाला केक फासणे ,डोक्यात अंडी फोडणे, रात्री अपरात्री फटाक्यानी इतरांची झोप मोड करणे.उसन वारी करून पैसे बुडविणे .या पद्धतीने असे वाढदिवस गणले जातात. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. सुखाच्या दिवशीच हौसे नवसे गौसे यांना कोठडीमध्ये रात्र घालवावी लागते.
या सर्व गोष्टीला फाटा देऊन सातारा शहरातील युवा कार्यकर्ते पंकज खुडे यांनी सातारा शासकीय क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी मोफत अन्नदान करून गोरगरीब व सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या शुभेच्छा घेतल्या.
या उपक्रमाला रेवरेंट एच डी भालेकर, ब्रदर एन डी भालेकर ज्येष्ठ पत्रकार डॅनियल खुडे जॉन तथा जयदेव खुडे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत तथा बंडा भोरे, योगेश मस्के, मनीष भोसले, अमर कांबळे, ओमकार भोसले ,जाणीव वृत्तवाहिनीचे संचालक आर .डी .भोसले यांचे उपस्थितीमध्ये अन्नदान करण्यात आले.
यावेळी महेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक माधव सारडा यांनी माहेश्वरी ट्रस्टतर्फे आभार मानले. समाजामध्ये चांगले वर्तन करून चांगले विचार करणाऱ्या लोकांमुळे क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त व इतर कार्यक्रमाच्या औचित्य साधून समाजातील दानशूर व्यक्ती अन्नदान करत आहेत या अन्नदानामुळे गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा आशीर्वाद मिळत आहे या उपक्रमाला समाजानेही चांगली साथ दिली आहे अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी पंकज खुडे यांना शुभेच्छा दिल्या.

—————————————————————–
फोटो – युवा कार्यकर्ते पंकज खुडे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अन्नदान करताना मान्यवर (छाया अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button