ऐरोली:-एम.बी.ए फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग क्रीडा महोत्सव.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
एम.बी.ए फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग क्रीडा महोत्सव.
ऐरोली सेक्टर 14 येथील अर्जुन निंबा सोनवणे खेळाचे मैदानात एम.बी.ए फाऊंडेशन ऐरोली यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग क्रीडा महोत्सव सकाळी ८ वाजता पार पडला .
सदर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी
मा.ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील ,बॉम्बे हाईकोर्टचे कक्ष अधिकारी रवी पवार, मिनाक्षी बालसुब्रमण्यम -अध्यक्ष एमबीए फाउंडेशन,शिवाजी देसाई ट्रस्टी एमबीए फाऊंडेशन, जयश्री विश्वनाथन -ट्रस्टी एमबीए फाऊंडेशन, मीनल मंडलिक -सेल्फ एस्टीम फाउंडेशन ऐरोली,अखिल श्रीराम -ट्रस्टी एमबीए फाऊंडेशन
जयश्री पाटील सीओओ -एमबीए फाऊंडेशन,
आशा संखे-सोशल वर्कर एमबीए फाऊंडेशन,कैलास परमार -एमबीए फाऊंडेशन ,नॅन्सी सेटना एमबीए फाऊंडेशन, मुख्याध्यापिका ललिता वाणी ,समाजसेवक राजेंद्र जोशी ,दिव्यांग खेळाडू,पालक,शिक्षक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम पाहुणेच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून पूजा करण्यात आली .व्यासपीठावर सर्व मान्यवरच मुलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .तसेच पाहुणेच्या हस्ते सर्व ट्रस्टी व इतरांचे स्वागत करण्यात आले. तसेंचसर्व मान्यवरांना गिफ्ट देखील देण्यात आले . सदर क्रीडा महोत्सवात एमबीए फाउंडेशनने ऐरोली, सनशाईन स्कूल, आँचल वोकेशनल सेंटर ठाणे, आधार फाउंडेशन, चैतन्य उद्योग शाळा, होली क्रॉस स्पेशल स्कूल, स्वयंम सिद्ध संस्था इत्यादी शाळांनीसहभागी नोंदविला.
मान्यवरांच्या व क्रीडा प्रेमी यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून मैदानात फिरवण्यात आली. मान्यवरच्या हस्ते श्रीफळ वाढवून व आकाशात फुगे सोडून क्रीडा महोत्सवाची सुरवात करण्यात आली. एकूण ठाणे,मुंबई व नवी मुंबईतून अनेक दिव्यांग खेळाडू व त्यांचे पालक स्पर्धेसाठी उपिस्थित होते . 100 मी धावणे , गोळा फेक, लिंबू चमचा, बटाटा शर्यत, फुगे फुगवणे, क्रम्पलिंग पेपर, रांगोळी,चित्रकला, अनेक स्पर्धा घेण्यात आल्या . सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर क्रीडा महोत्सवात विविध कला,क्रीडा प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात दीव्यांग खेळाडू पालक वर्ग आदी मान्यवर मोठया संख्येने उपिस्थित होते .
सदर क्रीडा स्पर्धा पार क्रीडा शिक्षक श्री प्रदीप मस्तूद व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया.