बामणोली-(सातारा):-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे भेटीने ग्रामस्थ सुखावले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे भेटीने ग्रामस्थ सुखावले.
बामणोली दि:
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुपारी दरे तालुका महाबळेश्वर या आपल्या मूळ गावी खाजगी हेलिकॉप्टरने आज आले. त्यांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली .
महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाला भरघोस मताधिक्य दिल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम श्री उत्तेश्वर देवस्थानला जाऊन श्री चे दर्शन घेतले. सर्वप्रथम त्यांनी दरे ग्रामस्थांची भेट घेऊन पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण जी प्रार्थना केली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. नवी दिल्ली येथे भाजपचे नेते यांची भेट घेण्यासाठी महायुतीचे तीन नेते गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणीस, अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्या. असं अमित शहा यांनी सांगितले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आले . या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी काही काळ दूरदर्शन संचाच्या पुढे बसले. आणि राज्यातील घडामोडीचा आढावा घेतला. काहींशी थेट मोबाईल द्वारे संवाद साधला.
अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद मिळाले हाच गौरव आहे. .महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काय निर्णय घेतला जाईल. तो मला मान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्यामुळे दरे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे.
स्थानिक काही पत्रकारांशी त्यांनी आवर्जून संवाद साधला. एकूण मतदान प्रक्रिये बाबत विरोधकांनी घेतलेल्या आरोप व मतदानाबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. उद्याचे तातडीने पुन्हा एकदा मुंबईला रवाना होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
आज सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी शासकीय पातळीवर चर्चा केली. महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी असल्यामुळे गरम कपडे घालूनच इच्छुकांनी दरे गावी यावे. उद्या दुपारी ते पुन्हा मुंबईला जाणार असल्याचे काहीही सांगितले.