सातारा:-(नागठाणे)-महाराष्ट्रांत नावलौकिक असलेल्या लोक कलावंत मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाला नागठाणे येथील खेळाला तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्रांत नावलौकिक असलेल्या लोक कलावंत मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाला नागठाणे येथील खेळाला तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
सातारा:- नागठाणे पंचक्रोशी मध्ये नावाजलेल्या प्रभू श्रीराम रथ यात्रेनिमित्त नागठाणे गावांमध्ये रथसप्तमीच्या काळामध्ये सात दिवस भव्य आणि दिव्य स्वरूपात यात्रा भरली जाते. या यात्रेचे खास वैशिष्ट्ये पूर्वपरगत चालत आलेला बैलबाजार या यात्रेतील प्रमुख वैशिष्ट्ये साठी नागठाणे चे गाव भौगोलिक दृष्ट्या डोंगर कपारीच्या ४० गावांचा संपर्क असलेले मुख्य बाजारपेठ असलेली ही नागठाणे गाव 3 तालुक्यातील, जवळपास असलेल्या छोट्या मोठ्या वाड्या वस्तीवरून दररोज येथील लोक आपल्या दैनंदिन जीवनातील प्रमुख वस्तूंच्या खरेदी करण्याकरिता रोज नागठाणे येथे येत असतात.
आणखी एक आकर्षण म्हणजे दरवर्षी या यात्रेमध्ये पारंपारिक चालत आलेल्या लोकनाट्य तमाशा मंडळाचेखेळ दिनांक 4/2/ 2025 रोजी झालेल्या खेळाचे औपचारिक उदघाटन करताना नागठाणे गावचे उप सरपंच श्री. अनिल साळुंखे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री बत्तू तात्याबा मोहिते, माझी स्मार्ट सरपंच श्री विष्णू महादेव साळुंखे पाटिल,माझी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष साळुंखे पाटिल, श्री.संजय साळुंखे, महेश तावरे (वकील साहेब),वर्धन ऍग्रो साखर कारखाना संचालक श्री.अविनाश साळुंखे,युवा नेते श्री.नंदकुमार नलवडे, सरकार टाईम्स चे कार्यकारी संपादक श्री. जिवन मोहिते सर,श्री.एकनाथ राठोड, श्री.अमोल नलवडे सर व कार्यक्रमास नेहमीच सहकार्य करणारे आमचे श्री. चंद्रकांत राजे(फॉजी वडापाव)व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.