आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जिल्हा सचिव पदी डॉक्टर शरद दुधात.

पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर

लोहगाव (वार्ताहार):

 अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या जिल्हा सचिवपदी व राहाता तालुकाध्यक्षपदी प्रा.डॉ. शरद दुधाट यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर येथे माध्यमिक शिक्षक भवनामध्ये अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये राहाता तालुकाध्यक्षपदी व जिल्ह्याच्या सचिवपदी प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. शरद दुधाट यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ टकले यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंत गवळी तसेच महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. भास्करराव जऱ्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी पीएच.डी मिळाल्याबद्दल व जिल्हा व तालुका कार्यकारणीवरती निवड झाल्याबद्दल डॉ. दुधाट यांचा डॉ. नवनाथ टकले व भास्करराव जऱ्हाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब म्हस्के पाटील, अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, प्राचार्य नानासाहेब शेळके, डॉ. शिरीष लांडगे पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष अश्रूबा फुंदे, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. संतोष फासगे, महासंघाचे सरचिटणीस लक्ष्मण रोडे, मुख्याध्यापिका ज्वाला कांबळे, पर्यवेक्षक देवराम वडीतके, उपप्राचार्या अलका आहेर, डॉ. माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र डोळे, जवाहरलाल पांडे, अरुण कुळसुंदर, डॉ. संदीप घोडे यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button