सातारा:-तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिलाणी विद्यालयाचा व्दितीय क्रमांक.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिलाणी विद्यालयचा व्दितीय क्रमांक.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा अंतर्गत शालेय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन .१०ते २२ऑगस्ट २०२२ घेण्यात आले या प्रदर्शना मध्ये श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यु इंग्लिश स्कूल पिलाणी तालुका सातारा या विद्यालयाचा व्दितीय क्रमांक आला या मध्ये सहभागी विद्यार्थी प्रणय दिलीप यादव इयत्ता नववी या विद्यार्थ्यांने सोलर मोबाईल चार्जर हे उपकरण सादर केले व सोलर उर्जा पासून होणार विद्युत उपकरणे यांच्या विषयी माहिती सांगितली या उपक्रमासाठी मार्गदर्शक शिक्षक श्री चव्हाण सर तसेच मुख्याध्यापक श्री खराते सर यांचे सहकार्य लाभले .या उपकरणांची २३ ते ३१ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास निवड झाली असून विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक यांनी
अभिनंदन केले.