नाशिक:- त्रंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवरती अजामीन पात्र गुन्हा दाखल करून यांच्या मुसक्या आवळा – RPS STAR NEWS
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
नाशिक:- त्रंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवरती अजामीन पात्र गुन्हा दाखल करून यांच्या मुसक्या आवळा – RPS STAR NEWS

पत्रकारांवरील हल्ल्याचा ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युज च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी निंदनीय कृत्ये आहेत. पत्रकार समाजासाठी सत्यासाठी, सामाजिक हितासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र काम करतात. अशा पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीने केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज च्या वातीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा कोणीही पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही,अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.




