श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गणित विज्ञान प्रदर्शन सोहळा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गणित विज्ञान प्रदर्शन सोहळा.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे आज दिनांक 20 11 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडगाव येथे शाळा स्तरावरील गणित व विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक पत्रकार प्रवीण साळवे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धवजी शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे व शालेय समितीचे सदस्य प्रवीण साळवे असे म्हणाले की शालेय जीवनामध्ये लहानपणापासून ते मोठे हो पर्यंत शिक्षकांचे व महापुरुषांचे विचारधारेवर आपण मोठे होऊ शकतो तसेच भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विज्ञान व गणितावर भर देऊन भारताच्या प्रगतीवर मोठे योगदान निर्माण केले आहे त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आमच्या समितीने श्रद्धांजली अर्पण करून हे शालेय जीवनातील महत्त्व आज ना उद्या युवकांच्या प्रगती पथावर उंचीवर घेऊन काहीतरी करून दाखवू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप असणे सौ ललिता उमाप श्री गोरक्षनाथ गुडेकर सुमनबाई आसणे सौ सुरभीताई दांगट आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक श्री देवदास मनतोडे सर यांनी प्रास्ताविक केले श्री मल्हारी ठोकळ सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिरू धोंगडे सर यांनी केले होते
याप्रसंगी शाळेच्या सौ रंजना बोर्डे मॅडम संगीता जाधव मॅडम सौ संगीता उंडे मॅडम वंदना गवळी मॅडम
व उपस्थित यावेळी लहान गटातून मृत्युंजय गाडे व कृष्णा उद्धव लाटमाळे मोठ्या गटातून श्रद्धा नानासाहेब शिंदे यांचे उपकरण सर्व सर्वांना मन वेधून घेणारे वाटले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी खरोखर नावलौकिक व अभ्यासू आहे हे सर्वांच्या व प्रमुख अति त्यांच्या निदर्शनास येऊन ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस योग्य ते वळणावर नेऊन शाळा सुजलम सुफलम होण्यासाठी पर्यायी उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी केले तसेच शालेय व्यवस्थापन करत असताना शाळेमधील येणाऱ्या अडीअडचणी सगळ्या समजून घेऊन शाळेला जास्तीत जास्त लोकसभागातून व शासकीय मंजुरीतून विकास कामात योग्य तो निर्णय घेऊन शाळा योग्य मार्गावर नेऊन असे आश्वासन देण्यात आले.तसेच शाळेचे व प्रमुख अतिथींचे सौ संगीता जाधव मॅडम यांनी आभार मानले.





