निमसोड:-निमसोडला शुक्रवारपासून सिद्धनाथाचा यात्रोत्सव.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
निमसोडला शुक्रवारपासून सिद्धनाथाचा यात्रोत्सव.
निमसोड. दि .19 निमसोड (ता. खटाव )येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवार ता.24नोव्हेंबर ते सोमवार 27 अखेर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमशील कार्यक्रम होणार आहेत शुक्रवार ता.24 रोजी दुपारी एक वाजल्यापासून गज्यांचा कार्यक्रम व सायंकाळी देवाची पालखीतून मिरवणूक छबीना कार्यक्रम होणार आहे तर यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सुरुवात होणार आहे शनिवार ता.25 रोजी सकाळी 11 वाजता यात्रेचा मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे तर रात्री वैभव ऑर्केस्ट्रा यांचा कार्यक्रम होणार आहे रविवार ता.26 रोजी दुपारी दोन इनामापर्यंतच्या नामांकित मल्लाच्या कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान भरविन्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे करावडीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे सोमवार ता.27 रोजी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत तानाजी भोसले वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे दुपारी 12 वाजता बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत प्रथम क्रमांक 1 लाख 51 हजार, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 75 हजार, चतुर्थ क्रमांक 51 हजार, पाचवा 31 हजार, सहावा 21 हजार, सातवा 11 हजार रुपये तर प्रवेश फि 1000 रुपये ठेवण्यात आली आहे रात्री टेम्भूर्णी येथील रंगबहार ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे मंगळवार ता.28 रोजी पुजारी डेकोरेशन यांच्यातर्फे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.