सातारा:-शिवतेज युवा प्रतिष्ठान, कालगाव, श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझं गाव माझा किल्ला भव्य किल्ला स्पर्धा 2023 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी
शिवतेज युवा प्रतिष्ठान, कालगाव, श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझं गाव माझा किल्ला भव्य किल्ला स्पर्धा 2023 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
दिनांक 15/11/2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता कालभैरव मंदिर येथे पार पडला.यावेळी 23 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत पहिला क्रमांक श्री रमेश चव्हाण भाऊ यांच्यावतीने चि.यश सुधाकर चव्हाण, द्वितीय क्रमांक श्री अशोक सावंत सर यांच्यावतीने चि. प्रथमेश धनाजी तावरे , तृतीय क्रमांक श्री सागर आनंदराव चव्हाण यांच्यावतीने चि.श्रेयस सुशील पुजारी यांना प्रदान करण्यात आला तसेच 3 स्पर्धक चि.आदित्य शिंदे, चि.प्रतीक माळी, चि.आयुष चव्हाण यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आला. तसेच 16 स्पर्धकांना उत्तेजनार्थ देण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी व सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच समर्थ हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री कुंभार सर यांना आधार सामाजिक संस्थेचा समाजरत्न पुरस्कार व कालगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री संतोष चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा वाचनालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराड पंचायत समिती माजी सदस्य मा.रमेश चव्हाण भाऊ, कालगावचे सरपंच मा.सोमनाथ चव्हाण, उपसरपंच योगेश चव्हाण, अधिकारी प्रशांत जाधव सर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन वसंत भोसले, जेष्ठ नेते दिलीप दादा चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सोसायटी संचालक राजेंद्र तावरे, कृष्णत वारे अशोक सावंत सर, भारत शिंदे, दादा महाराज, प्रदीप चव्हाण, तानाजी तावरे, ज्योतिर्लिंग वाचनालय चे संतोष चव्हाण, संकेत चव्हाण, सर्व स्पर्धक, युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.