क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात मुस्लिम बालगोपाळांनी तयार केलेला अजिंक्यतारा किल्ला आकर्षणाचे केंद्र.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात मुस्लिम बालगोपाळांनी तयार केलेला अजिंक्यतारा किल्ला आकर्षणाचे केंद्र.

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले. त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे. वास्तविक पाहता बालचिमुकल्यांना दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण, नवीन कपडे घालून फटाके उडविणे ,गोड धोड फराळ करणे याच्या पलीकडेही जग आहे. याची जाणीव या निमित्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील मराठ्यांचा साम्राज्य असलेला अजिंक्यतारा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. सोळाशे त्र्याहत्तर रोजी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे सुमारे दोन महिने राहिले होते. या किल्ल्याचा मोठा इतिहास असून या किल्ल्याच्या दरवाजाही शिल्पकार याचा नमुना आहे.
अजिंक्यतारा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी आहे. बारा वर्षाच्या रिहान जावेद बागवान व जहीर जावेद बागवान या दोन चिमुकल्यांनी चार दिवसाची मेहनत घेऊन हा मातीचा अजिंक्यतारा किल्ला तयार केला आहे. पाणी, माती, कागद, टायर ,फॉर्म, पाईप नळी याचा चांगल्या पद्धतीने वापर करून या दोन चिमुकल्यांनी किल्ला तयार केलेला आहे. गेली वीस वर्षापासून हा किल्ला दिवाळीनिमित्त बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अभिवादन केले जाते. यासाठी आजोबा सलीम बागवान यांची प्रेरणा मिळालेली आहे.
या किल्ल्यासोबतच शाहू स्टेडियम, सातारा बस स्थानक, राजपथ, मंगळाई देवी, हनुमान मंदिर , महादेव मंदिर ,जलमंदिर, राजपथ त्याचबरोबर ती या किल्ल्यावर केलेले विद्युत रोषणाई नेत्र दीपक म्हणावी लागेल. त्यांना रिहाना बागवान व मामा वासिम बागवान सर्फराज बागवान यांची मोलाची साथ मिळाली आहे .या किल्ल्यामुळे खऱ्या अर्थाने या चिमुकल्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा माहित पडलेला आहे. रिहान जावेद बागवान हा शाहूपुरीतील अभिनव माध्यमिक विद्यालय शिक्षण घेत आहे. तर त्याचाच जुळा भाऊ जहीर बागवान हा कोरेगाव येथील दि मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांच्या सर्वत्र कौतुक होत आहे.
——————————————–
चौकट – सातारा जिल्ह्यातील अनेक गावात हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा निर्माण झाला आहे. त्याला गालबोट लावण्याचा प्रकार घडत आहेत. पण, तरी ही एकमेकांना बद्दल असणारा जिव्हाळा व माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी अशा पद्धतीने मुलांवर संस्कार करणे गरजेचे आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सादिक मुल्ला ,महासचिव गणेश भिसे,काँग्रेस पक्षाचे नेते इमरान बागवान, इम्मु बागवान व रिपाइंचे नेते संजय गाडे यांनी सांगितले. शाहूपुरी नजीक आंबेदरे रस्त्यावर असलेल्या सद्गुरू कॉलनी मधील या बागवान कुटुंबीयातीलदोन चिमुकल्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेतली असल्याचे दिसून आले आहे.

_________________________________

फोटो -शाहूपुरी येथील चिमुकल्याने साकार केलेल्या अजिंक्यतारा किल्ला (छाया- अजित जगताप ,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button