वाई:-“शिरगावात सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ कार्यालयाचे भूमिपूजन; महिला सक्षमीकरणाला नवी दिशा”
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शिरगावात सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ कार्यालयाचे भूमिपूजन; महिला सक्षमीकरणाला नवी दिशा”

तालुका प्रतिनिधी सुरेखा भोसले
वाई तालुक्यातील शिरगाव येथे सामाजिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ कार्यालयाचे भूमिपूजन काल, दिनांक 19 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मंगलमुहूर्तावर उत्साहात पार पडले.
या कार्यालयासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या आमदार निधीतून तब्बल 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, गावातील महिला सक्षमीकरणासाठी ही मोठी मदत ठरणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पद्धतीने सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या सामूहिक सहभागातून ग्रामसंघाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात पंचायत समिती वाईचे नवनिर्वाचित सभापती विक्रांत भैया डोंगरे, उपसभापती वर्षाताई जगताप तसेच सदस्य हर्षदाताई फरांदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला बचतगट आणि ग्रामसंघाला निरंतर सहकार्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी माजी उपसभापती पंचायत समिती वाई महादेव भाऊ मस्कर, रमेश (आप्पा) गायकवाड (संचालक, वाई कृषी उत्पन्न बाजार समिती), सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर ग्रामस्थ, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुका युवक उपाध्यक्ष संदीप पिसाळ, ग्रामसंघ पदाधिकारी तसेच ‘सावित्रीच्या लेकी’ समूहातील सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेल्या या कार्यालयामुळे गावातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




