ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-नाऊर ग्रामपंचायत मध्ये ऐतिहासिक बदल – सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्यासह संपूर्ण पॅनलचा धुव्वा – १० / 0 च्या फरकाने सत्ता परिवर्तन.

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

 

 पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

नाऊर ग्रामपंचायत मध्ये ऐतिहासिक बदल – सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्यासह संपूर्ण पॅनलचा धुव्वा – १० / 0 च्या फरकाने सत्ता परिवर्तन.

(दिपक गायकवाड RPS स्टार न्यूज ) श्रीरामपूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाऊर ग्रामपंचायत च्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मोठे परिवर्तन घडवत माजी आमदार मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास गटाला धक्का देत आ.कानडे, ससाणे, विखे गटाच्या जनसेवा परिवर्तन मंडळाला संपूर्ण गटाला बहुमत देत राखीव असलेले सरपंच पद खेचण्यात देखील यशस्वी झाले. माजी सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्यासह पूर्ण गटाचा धुव्वा उडवला. नुतन लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ. नंदा सुनिल अहिरे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
येथील ग्रामपंचायतची लढत अतिशय चुरशीची नव्हे तर एकाकी ठरली असुन विरोधी बहुतांशी सदस्य १०० मतांच्या वरच्या फरकाने निवडून आले तर पराभवाचा सर्वात कमी आकडा २७ मताचा ठरला.वार्डनिहाय मतदान कंसात विजयी / पराभव व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे वार्ड नं. १ मधुन सरपंच पदाच्या उमेदवार सौ. नंदा सुनिल अहिरे यांना *280* तर सौ. छाया शरद गवळी 186 तर सदस्य पदासाठी चे उमेदवार अनिकेत किशोर अहिरे यांना *288 ( विजयी )* तर शरद गवळी यांना 184 ( पराभुत, सौ. अनिता प्रताप शिंदे यांना *249 (विजयी )* तर सौ. मंदा सुरेश गुंड यांना 222 ( पराभुत ) तसेच सौ. नंदा विकास त्रिभुवन यांना *288 (विजयी )* तर सौ. त्रिभुवन 184 ( पराभुत )
वार्ड नं २ मध्ये सरपंच पदाच्या उमेदवार सौ. नंदा सुनिल अहिरे यांना *324* तर सौ.छाया शरद गवळी यांना 237 मते सदस्य पदाचे उमेदवार दिंगबर कचरू शिंदे यांना *300 ( विजयी )* तर सोन्याबापू गोविंद शिंदे यांना 265 ( पराभुत ) तर सौ. हिराबाई भानुदास भवार *301 ( विजयी )* सौ. कांताबाई सुभाष शिंदे 261 ( पराभुत ), सौ. शिल्पा रामसिंग गहिरे यांना *298 (विजयी)* सौ. शोभा नामदेव लहिरे 262 ( पराभुत )
वार्ड नं. ३ मध्ये सरपंच पदासाठी सौ. नंदा आहिरे यांना *326* ( विजयी ) तर सौ. छाया शरद गवळी 212 ( पराभुत )
सदस्य पदासाठी मुसाभाई बाबु पटेल यांना *375 (विजयी )* तर सुरज विजय गायकवाड यांना 228 (पराभुत ) प्रितिश केशव देसाई *390 ( विजयी )* कैलास अच्युतराव देसाई 212 ( पराभुत ) तर सौ.स्वाती संतोष वाघचौरे *402 (विजयी)* सौ. सुलभा साहेबराव वाघचौरे 199 ( पराभुत) अशा फरकाने ही निवडणूक झाली.सरपंच पदाचे उमेदवार सौ नंदा अहिरे यांनी तिनही वार्डातून लीड घेत सुमारे 930 मत घेत 295 मताने विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ छाया गवळी यांना 635 मतावर समाधान मानावे लागले. तर वार्ड नं ३ मधुन सर्वाधिक मते सौ. स्वाती वाघचौरे यांनी घेत प्रतिस्पर्धी उमेदवार सौ. सुलभा वाघचौरे यांचा तब्बल 203 मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला.या निवडणुकीसाठी अनेकांनी प्रतिष्ठान लावली होती मतदानाच्या फुलीचा भाव ५ हजाराच्या आसपास गेला होता.
*चुलती सरपंच पुतण्या सदस्य*
*सरपंच पदी विराजमान होणाऱ्या सौ नंदा अहिरे यांचे पुतणे अनिकेत अहिरे हे देखील ग्रामपंचायत सदस्य झाल्याने एकाच कुटुंबातील दोघांना पहिल्यांदाच ग्रामपंचायत मध्ये संधी मिळाली*
चौकट *चुलते – पुतणेच्या लढाईत पुतण्याची बाजी*
*माजी सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे दिंगबर शिंदे हे प्रभाग २ मधुन ३०० मते घेत ३५ मतांनी विजयी झाले. तर सोन्याबापू शिंदे यांना 265 मते मिळाली ही लढत मोठी लक्षवेधी लढत ठरली*
*हा लोकशाहीचा विजय -*
झालेली ग्रामपंचायत निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली होती. सर्व विजयाचे श्रेय सर्वसामान्य मतदाराला असून हा लोकशाहीचा विजय आहे. कुठलेही राजकारण व आकस न ठेवता गावामध्ये नवीन काय सुविधा निर्माण करता येईल आणि गावाचा विकास कसा करता येईल एवढेच ध्येय आहे .
*विजय शिंदे माजी पं.स. सदस्य*
*माणिकराव देसाई – सामाजिक कार्यकर्ते*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button