ताज्या घडामोडीराजकीय

सातारा:-ऑफ्रोह संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ऑफ्रोह संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.

सातारा दि:
शासकीय सेवेतील अधिसंख्य पदाच्या सेवालाल लाभाचा शासन निर्णय शुद्ध पत्र करून मिळावा तसेच कोळी समाजाच्या प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ऑर्गनायझेशन फोर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या (ऑफ्रोह ) वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आले.
या वेळेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष भारती धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, बनदेव थिगळे, नलिनी कोळी, राणी जाधव, उषा कुंभारे, राजाराम लोखंडे, उषा नगरधने, सागर माने, प्रदीप धुमाळ, गडकरी सर, अनिल बेचने व इतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
शासनाला जागे करण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. शासकीय स्तरावर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी कोळी जमातीला उदाहरणार्थ कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व विस्तारी क्षेत्रातील इतर जमातीच्या तीस वर्षे सेवा केल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन 11 महिन्यांचे अधिसंख्य पदाचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजाचे उमेदवारांना नवीन नियुक्ती देताना अधिसंख्य पदाचे आदेश दिलेले आहेत. जे कर्मचारी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. त्यातील काहींचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत. तसेच जी खरी जात आहे. त्याच पद्धतीने त्यांना त्या जातीमध्ये किंवा त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा आदेश केल्यानंतर अनेकांनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र परत केले आहे. बऱ्याच अनुसूचित जमातीच्या कर्मचारी सेवावर निर्देश केल्याप्रमाणे ज्या त्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्यामुळे अनुसूचित जमाती पद रिक्त झालेले असून ही पदे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून भरण्यात आलेली आहेत. हा शासन अध्यादेश सिद्ध असल्यामुळे क्षत्रिय अधिकारी तांत्रिक खंडाला सेवा खंड समजत असल्याने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढी थांबवण्यात आलेले आहेत . त्याची चौकशी करून सकारात्मक रित्या अंमलबजावणी करण्यात यावी.
मुंबई महानगरपालिकेतील सेवा निवृत्ती झालेल्यांना लाभ मिळावा. बेस्ट उपक्रमातील २४ कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व सेवा विषयक लाभ तसेच त्यांच्या हक्काच्या रजा मिळाव्यात व शासकीय नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा सेवा कर्मचाऱ्यांना शासन निर्णय २१/१२/२०१९ मधील ४.२ नुसार तात्काळ सेवेत घेण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन होत आहे. त्याचाच भाग म्हणून साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी महादेव कोळी व इतर समाजातील अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली.
आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. असे महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष भारतीय धुमाळ, गडकरी सर यांनी स्पष्ट केले. या वेळेला महिला कर्मचारी तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————–

कॅप्शन- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करताना कोळी व इतर अनुसूचित जमातीतील कर्मचारी (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button