पिंपरी चिंचवड:-लोकशाही वाचविण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ईव्हीएम विरोधात पिंपरीत आंदोलन.
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी
RPS STAR NEWS
लोकशाही वाचविण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ईव्हीएम विरोधात पिंपरीत आंदोलन.
पिंपरी चिंचवड दि. १ डिसेंबर २०२४
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकशाही मध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेला अपेक्षित असलेले मुद्दे, शासकीय धोरणे राबविण्या बरोबरच जनताच या देशातील सत्तेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरवत असते. परंतु सत्तेचा गैरवापर करून जेव्हा जनतेच्या हातातुन अनेक अधिकार हिसकवले जातात, तेव्हा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतो.
जनता योग्य सुशासन चालविण्यासाठी आणि सक्षम लोकशाही मुल्ये रुजविण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर येते. त्याच पद्धतीचा उठाव ईव्हीएम विरोधात होईल असे सध्याचे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये ईव्हीएम विरोधात रोष असून ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर आगामी निवडणूका घेण्यात याव्यात, तसेच सध्या झालेल्या निवडणूकीच्या निकालावर योग्य चौकशी करावी. अश्या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.
ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घ्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या वेळी उपस्थित विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष लहुजी लांडगे, शहराध्यक्ष सतिश काळे, शहर कार्याध्यक्ष विशाल मिठे, उपाध्यक्ष मुकेश बोबडे, सचिव बाळासाहेब मुळे, मराठा सेवा संघाचे वसंत पाटील, अनिल गाडे, गणेश देवराम, प्रकाश घोडके, सालार शेख, लहु अनारसे, प्रशांत चव्हाण, दिलीप कैतके, छावा संघटनेच्या शीतल मोरे, नरेंद्र पोटे, संजय गायकवाड, श्रीपती पाटील, जयंत गायकवाड, संजय भांगिदरे, विनोद ताटे, गजानन पाटील आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, सीपीएमचे सचिन देसाई, धम्मराज साळवे, शांताराम खुडे, रोहिनाज शेख, प्रदिप पवार, संजीवनी पुराणिक, संतोष शिंदे, शरद थोरात आदी उपस्थितांनी मनोगते व्यक्त करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकले आहे.
ईव्हीएम विरोधात आंदोलनाचे आयोजन सतिश काळे यांनी केले आहे.