सातारा हिल हाफ मॅरेथॉन एक्सपो मध्ये गरवारे वाई हाफ मॅरेथॉन 2025 ची जोरदार चर्चा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा हिल हाफ मॅरेथॉन एक्सपो मध्ये गरवारे वाई हाफ मॅरेथॉन 2025 ची जोरदार चर्चा.

सातारा : सातारा शहरात धावण्याचा उत्साह चरमसीमेवर! दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी शेंद्रे येथील अभयसिंह राजे सांस्कृतिक भवनात झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्सपोमध्ये गरवारे वाई हाफ मॅरेथॉन 2025 चे धमाकेदार प्रमोशन झाले.
एक्सपोमध्ये खास स्टॉल उभारून मॅरेथॉनची माहिती देण्यात आली. आकर्षक पोस्टर्स, माहितीपत्रके आणि धावण्याच्या मार्गाचा आढावा पाहून धावपटूंनी मोठ्या उत्साहाने स्टॉलला भेट दिली. वाईच्या निसर्गरम्य डोंगर-दऱ्यांत धावण्याचा अनोखा अनुभव घेण्यासाठी अनेकांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे वाई मॅरेथॉनची चर्चा साताऱ्यात रंगली आहे. “या वर्षी वाईच्या मॅरेथॉनला वेगळाच उत्साह असेल,” असा विश्वास अनेक धावपटूंनी व्यक्त केला.
या एक्सपोमुळे गरवारे वाई हाफ मॅरेथॉन 2025 च्या दिशेने मॅरेथॉनप्रेमींमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.




