क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वडूज:- कु.जान्हवी विकास पिसाळ हिचे तालुकास्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वडूज:- कु.जान्हवी विकास पिसाळ हिचे तालुकास्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश.
दिनांक ७/१२/२०२२ रोजी वडूज येथे झालेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत जि. प. शाळा नांदणी वस्ती येथील विद्यार्थिनी कु. जान्हवी विकास पिसाळ हिने उज्ज्वल यश संपादन केले. यात तिने हस्ताक्षर स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल तिचे सरपंच; उपसरपंच;सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बोलताना सरपंच म्हणाले की नांदणी वस्ती शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय चांगला असून या शाळेचे मुख्याध्यापक यांचे कार्य व कामकाज अतिशय चांगले आहे. त्यांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा. मुख्याध्यापक यांनी सर्वाचे आभार मानले.