आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निर्भया पथकाने दिले स्वसंरक्षणाचे धडे.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निर्भया पथकाने दिले स्वसंरक्षणाचे धडे.

आज आमच्या आश्रमशाळेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, कोरेगाव येथील निर्भया पथकाने आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले.

तायक्वांदो खेळाडू कु.भक्ती चव्हाण आणि कु. प्रतीक्षा वीर यांनी आपल्यावर होणारा हल्ला परतवून लावणे आणि प्रतिहल्ला करून आपला बचाव करणे याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अमर चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वसंरक्षण हे महत्वाचे असून त्याचा वापर योग्य ठिकाणी करावा असे सांगितले.

यावेळी पोलीस हवालदार के.पी. सानप , पो. कॉ. विजय राठोड, पो. कॉ. राहुल मदने, पो. कॉ. संतोष जाधव, श्री. रविंद्रनाथ मोहिते सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button