श्रीरामपुर तालुक्यातील भोकर शिवारात आयशरच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे ठार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
आयशरच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे ठार. श्रीरामपुर तालुक्यातील भोकर शिवारातील घटना.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपुर नेवासा राज्य मार्गावर भरधाव आयशरने मोटारसायकला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात काकांच्या दहाव्याहुन घरी परतत असलेले नेवासा तालुक्यातील निपानी निमगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोघा सख्या भावांचा गंभीर जखमी होवुन त्यांना उपचारासाठी नेत असताना मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली . या अपघाताने निपाणी निभगाव गावावर शोककळा पसरली आहे
अपघात घडल्यानंतर जि . प शाळेच्या प्रश्न पत्रिका घेवुन जाणारा ट्रक राज्य मार्गांच्या साईड गटरमध्ये उलटला व ट्रक चालक पसार झाला . याबाबत रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी परिसरातील तरुणांनी मदत केली . श्रीरामपुर – नेवासा राज्यमार्ग क्र 44 वर काल शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील नवले कुटूंबातील कर्ते पुरुष असलेले सख्ख्ये भाऊ शरद विनायक नवले (वय -36) व अविनाश विनायक नवले (वय 30) हे दोघे आपल्या जवळील मोटरसायकल ( क्र एम ए च 17 एक्यू 8685 ) हिने श्रीरामपुरकडून राहता तालुक्यातील काकांच्या दहाव्या हुन निपाणी निमगाव येथे आपल्या घरी जात असताना समोरून नेवाशा कहून श्रीरामपुर कडे जिल्हा परिषद शाळाच्या इयत्ता तिसरी ते आठवीच्या पहिल्या सत्रातील प्र त्रिक घेवू चाललेला आयशर ( क्र एमएच 12 टी व्ही 4092 ) या भरधाव वाहनाने विरुद्ध दिशेने येकुन या मोटार सायकलला जोराची धडक दिली व राज्य मार्गांच्या लगतच्या साईड गटारात जावून उलटला .