सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली पाहणी.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली पाहणी.

सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) पाहणी नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालनंतर केंद्रीय वन्य जीव समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या दोन संस्थांचा सकारात्मक अहवाल आणि इतर बाबींची पूर्तता झाल्यानंतरच घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी अजून किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. एप्रिल २०२६ नंतरच निविदा पूर्ण होऊन घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
सन १९८० च्या सुमारास कै.प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्यासह सोनवडे, जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांनी सोनवडे घाटमार्गासाठी आंदोलने सुरू केली. तर १९८५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री एस. एन. देसाई यांनी या घाटमार्गाला राज्य शासनाकडून मान्यता मिळवून दिली. त्यानंतर १९९० मध्ये या घाटमार्गासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्यकाळात सोनवडे घाट मार्गासाठी पर्यायी वनजमिनीची उपलब्धता करून वनजमिनींचा अडथळा दूर केला तर सन2021 मध्ये घाटमार्गच्या कामासाठी निविदा मंजूर करण्यात आली.




