कोल्हापूर:-(शाहूवाडी)-खर्डा वडार समाज संघटनेकडून गुणवंत विद्यार्थी गुणगौरव , सेवानिवृत्त समाज बांधवाचा सत्कार सोहळा..
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
खर्डा वडार समाज संघटनेकडून गुणवंत विद्यार्थी गुणगौरव , सेवानिवृत्त समाज बांधवाचा सत्कार सोहळा.
शाहूवाडी _ प्रा.श्रीमंत लष्कर अंगमेहनतीचे कामे, काबाडकष्ट करून रक्ताचे पाणी करून मुला- मुलीच्या शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाचे सोने करा असे आवाहन खर्डा वडार समाजाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ संजिवनी पाटील यांनी केले समाजातील इ१०वी १२वी च्या वर्गात उज्जवल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या वडार समाजातील प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले नवनाथ सुरवसे, लक्ष्मण लष्कर , राजाराम सुरवसे यांचा समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमंत लष्कर, महादेव धोत्रे डॉ. लाड , थोरात गुरुजी यांनी मनोगते व्यक्त केली .
कार्यक्रमासाठी खर्डा पोलिस दूर क्षेत्र मधील पोलिस अधिकारी श्री शेंडे , श्री म्हस्के, श्री मिसाळ ग्रामसेवक कैलास जाधव, माझी उपसरपंच भागवत सुरवसे, बिभिषण चौगुले, चेरअमन दिलिप सुरवसे ‘ रामदादा भोसले , पत्रकार दत्ता पवार ‘ संतोष लष्कर डॉ. सतिष लष्कर ‘ पत्रकार अनिल धोत्रे ‘ राजू लोंढे , वडार समाजातील सर्व पदाधिकारी ‘ मांढरदेवी नवरात्र मंडळाचे सर्व पदाधिकारी खर्डा व परिसरातील वडार समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खर्डा वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू (दादा) सुरवसे ‘ मच्छिंद्र (भाऊ) येवले यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत श्री युवराज धोत्रे आभार प्रदर्शन श्री रतन डोके यांनी केले.