कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुसेसावळी:- ता.खटाव येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारे उद्योग मंथन शिबिर संपन्न.

पत्रकार विशाल पिसाळ सातारा जिल्हा जनसंपर्क अधिकारी:-7447547711

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विशाल पिसाळ सातारा जिल्हा जनसंपर्क अधिकारी

 

आज मौजे-पुसेसावळी ता. खटाव येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारे उद्योग मंथन शिबिर श्री.नरेंद्र पाटील साहेब, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, श्री. धैर्यशीलदादा कदम जिल्हाध्यक्ष भाजपा सातारा, आमदार राजेश पाटील भोईसर, प्रणय कासार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई, संतोष बुकले संचालक सहकार बोर्ड ठाणे, महेश घार्गे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज, श्रीकांत पाटील ज्येष्ठ नेते भाजपा आणि विक्रमबाबा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी अण्णासाहेब विकास महामंडळाच्या विविध योजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागीय विकास अधिकारी वडूजचे घनश्याम सावंत, माणचे भाऊसाहेब शिंगाडे, पुसेसावळीचे सुधीर खाडे, वडगावचे किसन जाधव, तालुका समन्वयक अर्जुन भोसले, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रवीण गोयल,ओंकार नलावडे, कराड अर्बन को-ऑप. बँकेचे अंकुश थोरात, संजय वायकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे आशिष बैसवार हे बँक प्रतिनिधी, महामंडळ समन्वयक गणेश पाटील, स्वप्निल पाटील, ऋषिकेश पाटील, प्रा. बाबासाहेब साबळे यांचेसह पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील मराठा समाजातील होतकरू युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कदम, पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेते महेश पाटील, धनंजय पाटील, बबलू पाटील, दादासो कदम, बाबू पवार, श्रीकांत पिसाळ, ज्ञानेश्वर पवार, तुषार माने रणजित येवले, बाळूआप्पा थोरात, बापुसो कदम या तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button