सातारा:-सातार्यात मास च्या इंडस्ट्रियल एक्सपो २०२३ महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातार्यात मास च्या इंडस्ट्रियल एक्सपो २०२३ महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष.
सातारा : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी सातारा जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी आयोजित केले आहे. या मास च्या इंडस्ट्रियल एक्सपो २०२३ महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यामध्ये किर्लोस्कर ग्रुप, कल्याणी ग्रुप, कुपर ग्रुप यांचे अनेक दशकापासून देशाच्या औद्योगिक क्रांतीत सिंहाचा वाटा आहे.
सातारा जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी अनेक उद्योजक प्रयत्न करीत आहेत. सातारा हे तसे उद्योगवाढीसाठी उत्तम ठिकाण आहे. पुणे पासून अत्यंत जवळ, मुबलक पाणी, अखंडित वीज पुरवठा, दळणवळणाची उत्तम सोय यामुळे सातारा हे राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत आहे.
सातारा औद्योगिक क्षेत्रात स्वतःची उत्पादने असणारे अनेक उद्योग आहेत. त्यांना चालना देण्यासाठी, त्यांची उत्पादने जगाच्या बाजार पेठेमध्ये जाण्यासाठी आपण सातारा येथे मास औद्योगिक प्रदर्शन २०२३ चे आयोजन करत आहोत.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्याच्या सर्व औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक सातारला येणार आहेत, त्याच बरोबर संरक्षण विभाग, रेल्वे विभाग, कृषी विभाग इत्यादी सरकारी विभागातील राष्ट्रीय उद्योगांचे अधिकारी प्रतिनिधी प्रदर्शनास भेट देणार आहेत.
उद्योजकांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर देशविदेशातून औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील शिष्टमंडळे निर्यातक्षम उद्योगवाढीसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने विदयार्थाना अनेक नवीन प्रॉडक्ट अद्यावत मशीनरी व तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता येणार आहेत व त्यातूनच भावी उद्योजक निर्माण होणार आहेत. हा सर्व सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक वाढीस पूरक असा प्रकल्प आहे.
सातारा जिल्हातील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांनी यासाठी पुढाकार घेऊन या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.उद्योजकता विकास व सातारा जिल्ह्यात रबर, प्लास्टिक, औषध निर्माण, प्रेसशॉप्स,, वैद्यकीय यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी अवजारे आदीचे उत्पादक आहेत.
नवीन औद्योगिक धोरणामुळे सातारा जिल्हयात, शिरवळ, खंडाळा, लोणंद व फलटण येथे अनेक बहुराष्ट्रीय उद्योग उभारण्यात आले आहेत. या उद्योगांना तसेच पुणे, कोल्हापूर, चिपळूण, गोवा, बेळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित उद्योगांना अनेक प्रकारची यंत्रसामुग्री, मशिनरी, स्पेअर्स पार्टस व इतर सेवा कायमस्वरूपी लागत असतात. सातारा येथील उद्योजकांना यासाठी हि मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
सदर प्रदर्शानाव्दारे सातारा येथील उद्योगांची उत्पादने व उत्पादन क्षमता याची माहिती नवीन आलेल्या कंपन्यांच्या अधिकार्यांना करून देणे. हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.थोडक्यात म्हणजे मेक इन सातारा हा ब्रँड प्रमोट करणे व सातार्याच्या उद्योगवाढीला गती देणे, यासाठी मासने या प्रदर्शनाव्दारे एक मोठे पाऊल उचलले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार नारायणराव राणे, केंद्रीय मंत्री, भारत सरकार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या हस्ते दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, नामदार उदय सामंत उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य, नामदार शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संचनालय, भारत सरकार उपस्थित असणार आहे. पत्रकार परिषदेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्यासह मास चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, जितेंद्र जाधव, धैर्यशील भोसले, परेश आडवाणी, राजेश चोप्रा, गौरव वाखरिया उपस्थित होते.
————————————
चौकट ——–
सदरचे औद्योगिक प्रदर्शन हे सातारा जिल्ह्यातील उद्योग व्यवसायासाठी संधी ठरणार असून या ठिकाणी विविध अशा कंपन्या तसेच उत्पादक असे मिळून दीडशे स्टॉल्स असणार आहेत. ग्रामीण भागातील लघुउद्योजकांनाही संधी प्राप्त करून देण्यासाठी मास पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र मोहिते व धैर्यशील भोसले, नितीन माने, वसंत फडतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांनी यापूर्वी 2015 व 2018 नंतर आता 2023 रोजी भव्य औद्योगिक प्रदर्शनाची हॅट्रिक केली आहे. त्याबद्दल अनेक उद्योजकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
———————————–
फोटो कॅप्शन—- सातारा येथील मास इंडस्ट्रियल एक्सपो 2023 ची माहिती देताना लोकप्रतिनिधी व मास चे पदाधिकारी (छाया- निनाद जगताप, सातारा)