कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक – माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, जागतिक हात धुवा दिन, समाजकल्याण विभाग स्थापना दिवस साजरा.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज प्राथमिक – माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, जागतिक हात धुवा दिन, समाजकल्याण विभाग स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
आज आमच्या आश्रमशाळेत थोर शास्त्रज्ञ व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आवडीने ग्रंथालयातील पुस्तके घेऊन वाचली.
जागतिक हात धुवा दिनानिमित्त हात धुण्याची योग्य पद्धती आणि चांगल्या आरोग्यविषयक सवयी याविषयी उपशिक्षक श्री. महेशकुमार बोभाटे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्याचा समाजकल्याण विभागाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
उपशिक्षक श्री. रविंद्रनाथ मोहिते सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम आणि समाजकल्याण विभाग याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.