ताज्या घडामोडी

मायणी:-गाढवाने काढला तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्याचा लचका.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

गाढवाने काढला तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्याचा लचका.

मायणी प्रतिनिध__मायणी तालुका खटाव येथील चावडी परिसरातील मुजावर कुटुंबातील एक मुलगी कुमारी मोहरा मोशीन मुजावर वय तीन घराच्या अंगणात खेळत असताना अचानक दुपारच्या वेळेत एका पिसाळलेल्या गाढवाने मुलीच्या डोक्याचा लचका काढला आणि एकच गोंधळ उडाला ज्यावेळी गाढवाने मुलीच्या डोक्याचा लचका काढला त्यावेळी त्याच्या तोंडातून लाळ गळत होती त्या गाढवाने तिला फरपटत नेले मुलीच्या कानामागील डोक्याचा भाग पूर्णपणे निघाला काही क्षणात नातेवाईकांनी शेजाऱ्यांनी काट्याने दगडाने गाढवाला मारल्याने गाढवाने त्या मुलीला टाकून दिले व गाढव मागच्या रस्त्याने पळून गेली लगेचच त्या मुलीच्या नातेवाईकांनी विट्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केली पण तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मिरज येथील मिशन हॉस्पिटल येथे दाखल केली परंतु तिथेही व्यवस्थित उपचार न झाल्याने नातेवाईकांनी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल केले असून मुलीची तब्येत आता सुधारत आहे वडार समाजातील अनेकांनी गाढवे डुकरे पाळली आहेत ही डुकरे गाढवे शेतात घरात घुसून सत्यानास करतात तरी प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मायणी ग्रामस्थातून होत आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button