मायणी:-शिवप्रताप संस्था एक हजार कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण करणार__विठ्ठलराव साळुंखे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
शिवप्रताप संस्था एक हजार कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण करणार__विठ्ठलराव साळुंखे.
मायणी प्रतिनिधी__प्रताप शेठ दादा साळुंखे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना 2002 मध्ये झाली २०२७ मध्ये संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यात संस्थेच्या शाखा निर्माण करण्याचा मानस असून सन 2०२७ पर्यंत एक हजार कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार असल्याची ग्वाही संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी मायणी शाखेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात बोलताना दिली या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेची व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ (आप्पा )होते यावेळी संस्थेचे संचालक गोपाळ तारळेकर ,सिताराम हरगुडे ,डॉक्टर सयाजी पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मायणी शाखाप्रमुख सतीश कोकाटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की या शाखेच्या नऊ कोटी बत्तीस लाख ठेवी असून सात कोटी बत्तीस लाख कर्जे आहेत तर 21 लाख नफा झाला असून 16 कोटी 64 लाख व्यवसाय झाला आहे या शाखेने सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केले असल्याचे सांगितले याप्रसंगी डॉक्टर सयाजी पवार प्राध्यापक दिलीप पुस्तके इब्राहिम तांबोळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास राजाराम कचरे, धोंडीराम हटकर ,सोमनाथ माळी ,बाळासाहेब महामुनी, उत्तमराव घाडगे ,जहांगीर नदाफ छगन जाधव शिरीष साळुंखे तसेच महिला गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी संग्राम माने यांनी आभार मानले.(मायणी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळाव्यात बोलताना कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंतराव सपकाळ व संचालक गोपाळ तारळेकर दिसत आहेत)