श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती व कै.रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे माध्यमिक विद्यालय माळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माळेवाडी विद्यालयात तालुकास्तरीय शासकीय पावसाळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.
श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती व कै.रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे माध्यमिक विद्यालय माळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माळेवाडी विद्यालयात तालुकास्तरीय शासकीय पावसाळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
गेल्या तीन दिवसापासून तालुकास्तरीय शासकीय कबड्डी स्पर्धांचे नियोजन कै. रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय माळेवाडी या विद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे 30 सप्टेंबर 2023 रोजी मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होऊन दोन दिवस मुलींच्या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धांसाठी खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अविनाशजी आदिक साहेब व श्रीरामपूर नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय अनुराधाताई आदिक यांच्या शुभेच्छा संदेशासह माळेवाडीचे मा.सरपंच,उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे माळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन,व्हा. चेअरमन व त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि गावातील व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ व श्रीरामपूर क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अतिशय सुसूत्रपणे मुलींच्या स्पर्धा पार पाडण्यात आल्या. त्यानंतर दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी मुलांच्या 14 वर्षे वयोगट, 17 वर्षे वयोगट व 19 वर्षे वयोगट या स्पर्धांना सुरुवात झाली. या सामन्यांच्या वेळी खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य माननीय श्री हंसराज पा.आदिक व माननीय श्री सुनीलभाऊ पा. थोरात यांनी स्पर्धेला भेट देऊन आनंद व्यक्त केला.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विद्यालयाचे मुख्याध्यापक वसीम सय्यद सर व क्रीडा शिक्षक कुंडलिकराव शिरोळे सर यांच्या नियोजनाखाली व तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रशांतजी होन सर व उपाध्यक्ष विष्णुपंत राऊत सर तसेच सर्व तालुका क्रीडा समितीचे सदस्य व विविध शाळांचे पंच क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाने सुरळीतपणे या स्पर्धा सुरू आहेत.