
कात्रज चौक मृत्युच्या सापळ्यात जेरबंद…
कात्रज, दि. 27 (अब्दुलरहिम शेख ) : येथील “कात्रज चौक” हा “मृत्यूचा चौक” बनला आहे. या चौकातील वाहनाच्या वर्दळीमुळे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.रिक्षा आणि बस स्थानक मेन रोडवर असल्याने प्रवासासाठी बस व रिक्षा पकडण्यासाठी रस्ता क्रॉस करताना वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदरील कात्रज चौकातून कोंडव्याकडे जाणार्या रस्त्याला कॉर्नरवर रिक्षा थांबत असल्याने वाहतूकीची कोंडी होत असून पुढील पुलावर वाहतूक ठप्प होते. त्याचप्रमाणे कात्रज चौकातील संतोषनगरला जाणाऱ्या रस्त्यावर सुध्दा ऐन रस्त्यात रिक्षा थांबत असल्याने वाहतूकीची कोंडी पुढे दत्तनगर आणि जैन मंदिराच्या रस्त्याला सुध्दा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास येते.त्याचप्रमाणे कोंडव्याकडून चढावे येणारे जड वाहन, कंटेनर, ट्रक यांच्यामुळे स्वारगेट व नवलेकडे जाणार्या वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे.तरी संबंधितांनी जिवंत आणि वित्तहानी टाळण्यासाठी लवकरात लवकर याचे निरसन करावे अशी विनंती जनतेतून केली जात आहे.




