आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे प्राध्यापक दिलीप पुस्तके सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!.

पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे प्राध्यापक दिलीप पुस्तके सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!.

 

दि.२५(खटाव, सातारा) प्राध्यापक दिलीप पुस्तके सर यांचा वाढदिवस स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा भगतसिंग विद्यालय व अनंत इंग्लिश स्कूल मायणी येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी, यांनी केले होते. यावेळेस त्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला.

प्राध्यापक पुस्तके सर हे मायणी येथील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी गेली ३५ वर्षे तरुण भारत या वृत्तपत्रातून लोकांच्या विविध विषयांच्या व प्रश्नांच्या बातम्या देऊन लोकांना व समाजातील उपेक्षित वंचित घटकाला न्याय मिळून देण्याचे खूप मोठे काम केले आहे. प्राध्यापक दिलीप पुस्तके सर हे स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष देखील आहेत व त्यांनी नुकतीच टिळक विद्यापीठाकडून देण्यात येणारी बि.जे व एम.जे पदवी टिळक विद्यापीठ पुणे येथे १० वा क्रमांक मिळवत वयाच्या ६५ व्या वर्षी प्राप्त केली आहे,त्याच बरोबर जोतिष शास्त्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करत जोतिष शास्त्रात देखील PHD पदवी प्राप्त केली आहे बरेशी सेवा निवृत्त मंडळी निवृत्तीनंतर निवृत्तीला बोनस लाईफ म्हणून निवांत आयुष जगतात परंतु पुस्तके सर यांनी समज्यापुढे आदर्श ठेवत सेवा निवृत्ती ही कशी संधी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण दाखुन दिले आहे. यापूर्वी वडगाव येथे सेवा करत असताना पुस्तके सर यांनी संस्थेची खूप मोठी भौतिक प्रगती करून दाखवली आहे.
त्यावेळेस उपस्थित अध्यक्ष स्थानी केलेल्या भाषणात माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले की, पुस्तके सर आणि त्यांचा खूप मोठा विचारांचा प्रवास एकत्रित झालेला आहे त्याचबरोबर पुस्तके सर यांनी खूप मोठी साथ आम्हाला यापूर्वी दिली आहे व देत आहेत. यापूर्वी पुस्तक सर्वांनी उत्तम कामगिरी करत वडगाव येथे संस्थेची जशी भौतिक प्रगती करून दाखवली त्याच पद्धतीने स्फूर्ती शिक्षण मंडळात उपाध्यक्ष पदावर राहून त्यांनी याही संस्थेची भौतिक प्रगती करावी असे मत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर अअसे मत यांनी व्यक्त केलेवेगळे करून यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या बद्दल डॉक्टर म्हणाले की या संस्थेला बऱ्याच लोकांनी नाव ठेवली तरी देखील ही संस्था आज स्वतःच्या पायावरती उभी असून आज संस्थेला मान्यता मिळाली आहे तसेच संस्थेचे शासनाकडे असलेले आज पर्यंतचे येणे देखील सर्वोच्च न्यायालयात भांडून शासनाकडून मिळवून घेतलेले आहेत आता या संस्थेला कोणीही बंद पडकी संस्था किंवा भविष्यात बंद पडणारी संस्था असे संबोधू शकणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी दिले स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आता उत्तमरीत्या चालू असून आता ही बंद पडण्याची हिंमत कोणामध्ये नाही, पुढे ते विद्यार्थ्यांना संबोधत म्हणाले की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपल्या संस्थेचे व स्वतः चे नाव उज्वल करावे असे ते म्हणाले तसेच पुढे ते म्हणाले की लवकरच या ठिकाणी तीन मजली इमारत उभी करणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले तसेच प्राध्यापक दिलीप पुस्तके सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणले की माझ्या या प्रवासात माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा असून माझ्या पत्नी शिवाय हा प्रवास करणे शक्य झालं नसतं असे त्यांनी गौरव उद्गार काढले तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर यांचे आभार मानले तसेच उपस्थित सर्व मित्र ,पत्रकार, स्फूर्ती शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी व विद्यार्थी व सर्व मान्यवरांचे आभार मानले
या कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, राजू कचरे ,विजय कवडे , ॲड.एकनाथ जाधव,नंदकुमार पुस्तके, पत्रकार इमरान जमादार, विशाल चव्हाण, तानाजी चव्हाण,मंगेश भिसे ,सतीश डोंगरे , स्फूर्ती शिक्षण मंडळाचे सर्व कर्मचारी तसेच शिक्षक रुंद व खूप मोठ्या संख्येने त्यांचा मित्र परिवार या निमित्त उपस्थित

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button